Mysterious Spiral Light eSakal
विज्ञान-तंत्र

Mysterious Spiral Light : रात्रीच्या आकाशात दिसला रहस्यमयी निळा प्रकाश.. एलियन्स की आणखी काही? फोटो होतायत व्हायरल

Blue Spiral Light : बेटिना बेगटॉफ्ट या फोटोग्राफरने या निळ्या प्रकाशाचा फोटो टिपला होता. नॉर्वेमधील आकाशात हे दृश्य पहायला मिळालं.

Sudesh

Blue Spiral Light Norway : सोशल मीडियामध्ये सध्या एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. रात्रीच्या वेळी आकाशात एक रहस्यमयी निळा प्रकाश या फोटोमध्ये दिसत आहे. हा प्रकाश गोलाकार आकारात दिसत असल्यामुळे ही एलियन्सची उडती तबकडी (UFO) आहे की एखादी नवी आकाशगंगा यावरुन नेटिझन्समध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

बेटिना बेगटॉफ्ट या फोटोग्राफरने या निळ्या प्रकाशाचा फोटो टिपला होता. नॉर्वेमधील आकाशात हे दृश्य पहायला मिळालं. "उघड्या डोळ्यांनी हा प्रकाश पांढऱ्या रंगाचा दिसत होता. मात्र, कॅमेऱ्यात फोटो घेतल्यानंतर यातील सुंदर निळा रंग दिसून आला." अशी माहिती बेटिना यांनी दिली.

कशाचा होता प्रकाश?

हा प्रकाश स्पेसशिपचा आहे की एखाद्या आकाशगंगेचा यावरुन नेटिझन्समध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. मात्र हा प्रकाश दुसऱ्या-तिसऱ्या कोणत्या गोष्टीचा नसून, स्पेस-एक्स कंपनीच्या फाल्कन-9 (SpaceX Falcon-9) रॉकेटचा असल्याचं आता स्पष्ट झालंय.

या रॉकेटचं डी-ऑर्बिटिंग होत असातना त्यातील दुसरी स्टेज वेगळी झाली. या रॉकेटच्या भागामुळे हे दृश्य तयार झालं होतं. अशा प्रकारचं दृश्य दिसण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वीही स्पेस एक्सच्या रॉकेटमुळे अशी दृश्ये तयार झाली आहेत. त्यामुळे या प्रकाशाला 'स्पेस एक्स' स्पायरल असंही म्हटलं जातं. (SpaceX Spiral)

रॉकेटच्या सेकंड स्टेजमधून जळणारा गॅस रोटेशनल पद्धतीने बाहेर पडतो. यामुळे असे स्पायरल्स तयार होतात. केवळ नॉर्वेच नाही, तर आईसलँडमधील लोकांनाही हे दृश्य पहायला मिळाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT