Nagpur news Use Pin the Screen in the phone and be worry free
Nagpur news Use Pin the Screen in the phone and be worry free 
विज्ञान-तंत्र

‘Pin the Screen’चा वापर करा आणि व्हा चिंतामुक्त; तुमच्या मर्जीशिवाय चालणार नाही फोन

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आलेला आहे. किंबहुना स्मार्ट फोन जीव की प्राणच झाला आहे. मात्र, याचे जसे फायदे आहेत तसे नुकसानही पाहायला मिळत आहे. एका चुकीमुळे होत्याचे नव्हते होते. अनेकांचे बँक खाते रिकामे होऊन जाते. तर अनेकांच्या खाजगी गोष्टी व्हायरल होऊन जातात. म्हणून स्मार्ट फोन वापरताना मोठी काळजी घेण्याची गरज आहे. आम्ही तुमच्यासाठी कामाची बातमी घेऊ आलो आहे. यामुळे तुम्ही तुमच्या खाजगी गोष्टी व्हायरल होण्यापासून वाचऊ शकतात.

स्मार्ट फोन म्हणजे एकप्रकारची खाजगी माहिती झाली आहे. अनेकांचे बँक डिटेल्स, खाजगी फोटो, व्हिडिओ अशी माहिती मोबाईलमध्ये साठवलेली असते. या गोष्टी हाईड करण्याच्या अनेक ॲप्स गुगल प्लेवर उपलब्ध आहेत. मात्र, या ॲप्स खाजगी माहिती साठवून ठेवल्यावरही लिक होत असते. यामुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. 

आपल्या मोबाईलमध्ये असे काही फिचर असतात ज्याद्वारे आपण आपली फसवणूक होण्यापासून किंवा खाजगी माहिती सार्वजनिक होण्यापासून वाचवू शकतो. मात्र, याची आपल्याला साधी कल्पनाही नसते. आपल्या अज्ञानामुळे आपण आपले नुकसान करून बसतो. आज आपण अँड्रॉईड स्मार्ट फोनच्या अशाच एका वैशिष्ट्य़ाबद्दल माहिती घेणार आहोत. याचा वापर करताच तुमची समस्या सुटून जाईल.

या फीचरच नाव आहे  Pin the Screen (पिन द स्क्रीन). याला Screen Pinning असेही म्हणतात. या फीचरचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तुमचा फोन अनलॉक असतानाही कोणीही तुमच्या इच्छेशिवाय वापरू शकणार नाही. हा फीचर  ५.० च्या सर्व फोनमध्ये उपलब्ध आहे. चला तर जाणून घेऊया या फीचरबद्दल.

हे आहे ॲपचे वैशिष्ट्य

या फीचरद्वारा तुम्ही तुम्हाला आवश्यक वाटत असलेले फीचर स्क्रीनवर लॉक किंवा पिन करू शकता. यामुळे दुसऱ्या ॲपवर जाण्यासाठी लॉकस्क्रीन पासवर्डची गरज भासेल. याचा वापर केल्यानंतर तुम्ही तुमचा फोन दुसऱ्याला दिल्यास चिंता बाळगण्याची गरज भासणार नाही. बहुतेकवेळा असे दिसून आले आहे का कोणी त्यांना फोन हातायळा दिला तर ते इतर अ‍ॅप्समध्येही डोकावून पाहतात. या ॲपद्वारे तुम्ही कोणापासूनही आपला फोन सुरक्षित ठेऊ शकता.

असा करा वापर

सर्वांतअगोदर स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जा. यानंतर सिक्युरिटी ॲण्ड लोकेशन्स पर्याय निवडा. यानंतर ॲडव्हांस (प्रगत पर्याय) निवडा. हा निवडताच तुम्हाला स्क्रीन पिनिंगचा पर्याय मिळेल. यावर टॅप करून ऑन करा. आता तुम्ही ज्या ॲपला पिन करू इच्छिता त्या ॲपची निवड करा. त्यानंतर रिसेंट ॲपवर क्लिक करा. आता त्या अ‍ॅपला दाबून ठेवा आणि पिन पर्यायाची निवड करा. यानंतर दुसऱ्या अ‍ॅपवर परत जाण्यासाठी एकाच वेळी होम आणि बॅक बटण दाबा लागेल. तसेच लॉकस्क्रीन पासवर्डचा (संकेतशब्द) वापर करावा लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT