Habitable Worlds Observatory esakal
विज्ञान-तंत्र

NASA Super Hubble : आता एलियन्सचा शोध लागणार, नासा बनवतंय शक्तीशाली दुर्बिण; दुसऱ्या ग्रहांचे रहस्य उलगडणार

Habitable Worlds Observatory : अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था NASA 2040 च्या सुरुवातीला अवकाशात स्थापित करण्यात येणारे 'हाबिटेबल वर्ल्ड्स ऑब्झर्वेटरी' मोहिमेची तयारी करत आहे.

Saisimran Ghashi

NASA : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA आणखी एका धमाकेदार शोध मोहिमेची तयारी करत आहे. 2040 च्या सुरुवातीला अवकाशात स्थापित करण्यात येणारे 'हाबिटेबल वर्ल्ड्स ऑब्झर्वेटरी' (HWO) हे अतिशय शक्तिशाली दुर्बिण पृथ्वीबाहेरील जीवनाचा शोध लावू शकेल. तज्ञांचा अंदाज आहे की ही दुर्बिण 2050 पर्यंत एखाद्या रहिवासायोग्य ग्रहावर जीवन असल्याचे संकेत शोधून काढू शकेल.

हे दूरदर्शन जुन्या हबल दुर्बिणपेक्षा किती वेगळे असेल?

सजीव अस्तित्वाचे संकेत शोधणे - ही विशेष दुर्बिण अंतराळातील ग्रहांवर 'जैविक निर्मिती' असलेल्या वायूंचा शोध घेईल. जिवंत प्राण्यांमुळे तयार होणारे हे वायू पृथ्वीवर आढळतात त्याचप्रमाणचे असतील तर ते सजीव अस्तित्वाचे मोठी शक्यता दर्शवतील.

पृथ्वीसारखा ग्रह शोधणे- आत्तापर्यंत अंतराळात हजारो ग्रह आढळले आहेत पण पृथ्वीसारखा रहवास योग्य ग्रह अजून सापडलेला नाही. HWO दुर्बिण सूर्यासारख्या तारांच्या आसपास पृथ्वीसारखे ग्रह शोधण्यावर विशेष लक्ष केंद्रित करेल.

हे नवे दुर्बिण कसे काम करेल?

आधुनिक तंत्रज्ञान - जेम्स वेब दुर्बिणच्या यशस्वी प्रयोगानंतर आता येणारे हे HWO दूरदर्शन त्यापेक्षाही अधिक आधुनिक असेल. अवरक्त किरणांसह विविध प्रकारच्या प्रकाशाच्या स्पेक्ट्रमचा वापर करून ते ग्रहांवर अधिक बारिक निरीक्षण करू शकेल.

स्पष्ट आणि अचूक प्रतिमा - HWO इतके अत्याधुनिक असेल की ते पृथ्वीसारख्या ग्रहांवर वातावरणाचा सविस्तर अभ्यास करू शकेल आणि तेथील जीवन असल्याची किंवा नसल्याची शक्यता तपासू शकेल.

या शोधामुळे जगात कसा बदल होईल?

अंतराळात जीवनाचा शोध लागल्यास त्याचा प्रभाव फक्त विज्ञानवरच न राहता तत्वज्ञान, धर्म आणि आपल्या जीवनशैलीवरही होऊ शकते.एखाद्या ग्रहावर जीवन असल्याचे संकेत मिळाल्यास ते मानवी आकांक्षा आणि संशोधनाची दिशा बदलून टाकू शकते.

हे सर्व खरे ठरले तर मानवजातीच्या इतिहासात हा एक मोठा क्षण ठरेल. आपण विश्वातील एकटेच बुद्धीमान प्राणी नाही तर आपल्यासारखे अजूनही कोणीतरी असू शकतात याचा शोध लागणे रोमांचकारी आणि आपल्याला आश्चर्यात टाकणारे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

Viral Video : वजन झेपलं नाही अन् बंजी जंपिंगची दोरी तुटली..खोल दरीत पडून शरीराचे अवयव झाले वेगळे; धक्कादायक मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल

31st December Party : अभी तो पार्टी शुरू हुई है..! बार, पब अन् क्लब मध्ये ‘New Year Celebration’ पहाटे पाच पर्यंत चालणार

Politics: मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात उलथापालथ; विधानसभा उपाध्यक्षांनी दिला राजीनामा, कारण...

Latest Marathi News Live Update : शेअर बाजारात जादा परताव्याच्या आमिषाने ६८ लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT