Shubhanshu Shukla Space Mission Launch esakal
विज्ञान-तंत्र

Shubhanshu Shukla : शुभांशु शुक्लांनी घेतली ऐतिहासिक अंतराळ झेप; तीन सहकाऱ्यांसह मिशनसाठी रवाना..

Shubhanshu Shukla Space Mission Launch : भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्लाच्या यानाने नासाच्या ‘Ax-4’ मोहिमेसाठी उड्डाण केले आहे.आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे जाण्यासाठी हे अंतराळवीर सज्ज आहेत.

Saisimran Ghashi

Shubhanshu Shukla Space Mission Launch: भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणाला आहे, कारण भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे स्पेसएक्सच्या 'ड्रॅगन' यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) झेपावले आहेत.

अ‍ॅक्सिअम मिशन 4 (Ax-4) अंतर्गत होणाऱ्या या मोहिमेचा प्रक्षेपण आज (बुधवार) दुपारी 12.01 वाजता (भारतीय वेळेनुसार) नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधील लॉन्च पॅड 39A वरून करण्यात आहे. शुभांशू शुक्ला त्यांच्या तीन सहकाऱ्यांसह मिशनसाठी रवाना झालेत

या ऐतिहासिक उड्डाणावेळी शुभांशू यांच्या कुटुंबाचा ऊर भरून आला. उड्डाणापूर्वी त्यांच्या आई भावुक झाल्या होत्या, तसेच उड्डाणानंतर त्यांची पत्नी सासूच्या गळ्यात पडून रडल्या. त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान होता. हा क्षण फक्त भारतासाठीच नाही तर जगासाठीही अभिमानाचा होता

या मिशननंतर भारताला गगनयान मिशनसाठीही फायदा होणार आहे. गगनयान मिशनसाठीही शुभांशू यांची निवड करण्यात आली आहे

राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे हे दुसरे भारतीय ठरले आहेत. शुभांशू हे भारतीय वायुदलाचे खूप चांगले ऑफिसर आहेत. त्यांनी सेनेच्या अनेक मिशनमध्ये सहभाग नोंदवला आहे. नासाच्या या मिशनमध्ये ते यानचे पायलट म्हणून भूमिका बजावणार आहेत. तसेच अवकाशात गेल्यानंतर ते विविध गोसहीनवर संशोधनही करणार आहेत. त्यांचे यान 26 जूनला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी अंतराळात पोहोचणार आहेत. अवकाशात गेल्यानंतर त्यांनी देशवासीयांसाठी संदेश पाठवला आहे. त्यामध्ये त्यांनी शुभेच्छा देत जय हिंद, जय भारत असे म्हटले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT