NASA Warning eSakal
विज्ञान-तंत्र

NASA Warning : जमीनीत गाडलं जातंय 'हे' प्रसिद्ध शहर, काही वर्षांमध्येच जाईल पाण्याखाली; नासाचा गंभीर इशारा!

New York Report : या शहरातील गर्दी आणि तेथील इमारती यांमुळे शहराचं वजन वाढत असल्याचं नासाने म्हटलं आहे.

Sudesh

अमेरिकेतील न्यूयॉर्क हे शहर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. या शहरातील गर्दी आणि तेथील इमारती यांमुळे शहराचं वजन वाढत असल्याचं नासाने म्हटलं आहे. यामुळेच, येत्या काही वर्षांमध्ये हे शहर पाण्याखाली जाऊ शकतं, असा गंभीर इशारा नासाने दिला आहे.

न्यूयॉर्क पोस्टने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था नासाने म्हटलं आहे, की न्यूयॉर्क शहराचं वजन दिवसेंदिवस वाढत आहे. सोबतच, जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राची पातळी देखील वाढते आहे. या दोन्ही कारणांमुळे काही वर्षांमध्ये हे शहर पाण्याखाली जाऊ शकतं.

या भागांना बसणार फटका

न्यूयॉर्कमधील लागार्डिया एअरपोर्ट, आर्थर अ‍ॅश स्टेडियम आणि कोनी आयलँड या ठिकाणांना सर्वात आधी फटका बसणार आहे. लागार्डिया आणि आर्थर स्टेडियम या दोन्ही जागा अनुक्रमे 3.7 आणि 4.6 मिलीमीटर प्रतिवर्ष या वेगाने जमीनीखाली जात आहेत.

किती आहे शहराचं वजन?

न्यूयॉर्क शहराचं वजन हे 1.7 ट्रिलियन पाउंड असल्याचं एका रिपोर्टमध्ये समोर आलं होतं. या शहरात 10 लाखांहून अधिक मोठ्या इमारती आहेत. संयुक्त राज्य भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने या वर्षीच्या सुरुवातीला हे सर्वेक्षण केलं होतं.

किनारी भागात मोठा धोका

यापूर्वी 2012 साली सँडी या चक्रीवादळामुळे न्यूयॉर्कला तडाखा दिला होता. यावेळी किनारी भागातील संपत्तीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. भविष्यात अशा प्रकारच्या आणखी नैसर्गिक आपत्ती आल्यास न्यूयॉर्कच्या किनारी भागाला मोठा धोका असणार आहे. यामुळे यावर आतापासून उपाययोजना करण्याची गरज असल्याचं नासाने म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इन्स्टा, फेसबुकसाठी मोजावे लागणार पैसे, महिन्याला रिचार्ज; मेटाकडून सबस्क्रिप्शन मॉडेलची घोषणा, भारतात कसा आहे प्लॅन?

IT Park Land Transfer Kolhapur : आयटी पार्कची जागा ‘एमआयडीसी’च्या ताब्यात, औद्योगिक क्षेत्र करण्याची प्रक्रिया सुरू

पुणे, पिंपरी-चिंचवडसह नाशिकमध्ये CNG दरात वाढ, नवे दर आजपासून लागू

Ebola Case: काळजी वाढवणारी बातमी! काँगोहून आला अन् तब्येत बिघडली… अहमदाबादमध्ये इबोलाच्या संशयाने खळबळ, ४ जण आयसोलेट

‘८ वाजून १३ मिनिटे’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित; सुनील बर्वे–ऐश्वर्या नारकर यांची दमदार केमिस्ट्री चर्चेत!

SCROLL FOR NEXT