हवामान बदलावर अभ्यास करण्यासाठी NASA संशोधन मोहिम करणार आहे.  esakal
विज्ञान-तंत्र

NASA Mission : पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी NASAची ध्रुवीय प्रदेश मोहिम!

Earth’s Polar Region : आर्क्टिक आणि अंटार्क्टिकाचा देखील अभ्यास केला जाणार

सकाळ वृत्तसेवा

NASA Research : नासाचे दोन लहान उपग्रह पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी लवकरच प्रक्षेपित होणार आहेत. या उपग्रहांच्या आधारे पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशांमधून बाहेर अंतराळात जाणाऱ्या उष्णतेचा अभ्यास केला जाणार असून त्याचा हवामानावर कसा परिणाम होतो याचाही शोध घेतला जाणार आहे.

हवामान बदलावर अधिक माहिती मिळवण्यासाठी NASA या महिन्यात ध्रुवीय प्रदेशातील उष्णतेच्या गतीवर संशोधन मोहिम करणार असल्याचे नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (JPL) ने म्हटले आहे.

"पोलर रेडियंट एनर्जी इन द फार-इन्फ्रा रेड एक्सपरिमेंट (PREFIRE)" असे या मोहिमाचे नाव असून पृथ्वीवरील सर्वात दुर्गम प्रदेशांपैकी असलेल्या आर्क्टिक आणि अंटार्क्टिकाचा अभ्यास केला जाणार आहे.

उष्णता किती प्रमाणात अंतराळात जाते याचा मोजमाप घेण्यासाठी शूबॉक्सच्या आकाराचे दोन हवामान उपग्रह अंतराळात सोडले जाणार आहेत. पृथ्वीच्या पृष्ठभागावरून आणि वातावरणातून बाहेर अंतराळात जाणाऱ्या उष्णतेचे मोजमाप घेण्यासाठी थर्मल इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटरचा वापर केला जाणार आहे.

या मोहिमाच्या आधारे मिळालेल्या माहितीमुळे ध्रुवीय प्रदेशातील ग्रीनहाऊस परिणामाबद्दल अधिक माहिती मिळू शकेल. विशेषत: वातावरणातील वाष्प, ढग आणि इतर घटकांमुळे उष्णता कशा प्रकारे रोखली जाते याचा अभ्यास करता येईल.

हवामान आणि बर्फाच्या तुकड्यांच्या बदलांबद्दल अंदाज बांधण्यासाठी या संशोधनाचा वापर केला जाणार असून त्यामुळे समुद्रसपाटी, हवामान तसेच बर्फाच्या आवरणात होणारे बदल समजण्यास मदत होईल.

या मिशनकडून काय अपेक्षा?

  • पृथ्वीच्या वातावरणाचा आणि बर्फाचा ध्रुवीय प्रदेशांमधून बाहेर जाणाऱ्या उष्णतेवर कसा परिणाम होतो याची नवीन माहिती मिळवणे.

  • १९७० पासून आर्क्टिक प्रदेश पृथ्वीपेक्षा दीडापट जलद कसे गरम होत आहे याचे कारण माहिती करणे.

  • पर्वतावरील बर्फ आणि समुद्री बर्फाच्या माध्यमातून किरणोत्सर्ग कसा होतो आणि ढग्यांचा या किरणोत्सर्गावर काय परिणाम होतो याची माहिती मिळवणे.

  • पृथ्वी आणि अवकाश यांच्यातील उष्णतेची देवाणघेवाण विषयी अंदाज बांधणे आणि या बदलांचा बर्फाच्या थरावर, वातावरणाच्या तापमानावर आणि जागतिक हवामानावर कसा परिणाम होतो याचा अभ्यास करणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide Workers Strike : देशभरातील तब्बल ३० कोटी कामगार जाणार संपावर! ; ६०० जिल्ह्यांमधील कामं ठप्प होण्याची चिन्हं

Pune News : कोल्हापूरच्या आदेशाने पुण्यातील निवडणूक बिनविरोध

Shendurwada News : शेंदूरवादा गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुसंडी

Daund ZP Election Result : दौंड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ७ पैकी ६ जागा जिंकत आपले वर्चस्व कायम राखले

Pune Crime : फसवणुकीच्या गुन्‍ह्यात पसार झालेल्या पोलिस हवालदारास आंध्रप्रदेशातून अटक

SCROLL FOR NEXT