National Technology Day Sakal
विज्ञान-तंत्र

National Technology Day 2023 : आजच्या दिवसाचा इतिहास वाचून तुमचीही छाती अभिमानाने फुलून जाईल!

देशाच्या या यशाचा उत्सव म्हणून दरवर्षी या दिवशी तंत्रज्ञान दिन साजरा केला जातो.

वैष्णवी कारंजकर

११ मे १९९८ हा दिवस भारतासाठी ऐतिहासिक मानला जातो. या दिवशी देशाला मोठे यश मिळाले. हे यश भारतीय लष्कराशी संबंधित होतं. आम्ही पोखरण चाचणीबद्दल बोलत आहोत.

राजस्थानमधील पोखरण चाचणी रेंजमधून ही अणुचाचणी केली जात होती. ही भारताची पहिली नसून दुसरी अणुचाचणी होती. असे असूनही ही अणुचाचणी अनेक अर्थाने भारतासाठी खास होती. २५ वर्षांपूर्वी पोखरण-2 चाचणीसाठी भारताने पाच अणुस्फोट केले. या अणुचाचणीचे सांकेतिक नाव शक्ती-१ अणु क्षेपणास्त्र होतं. देशाच्या या यशाचा उत्सव म्हणून दरवर्षी या दिवशी तंत्रज्ञान दिन साजरा केला जातो.

देशाचे तत्कालीन राष्ट्रपती आणि एरोस्पेस अभियंता डॉ. एपीजी अब्दुल कलाम स्वतः या अणुचाचणीचे नेतृत्व करत होते. या यशानंतर अवघ्या दोन दिवसांनी भारताने दोन नवीन अण्वस्त्रांची चाचणी घेतली होती. हा देखील पोखरण-२ चा एक भाग होता. पोखरण-१ ही भारताची पहिली अणुचाचणी होती. पहिली अणुचाचणी १९७४ मध्ये झाली होती. पोखरण-२ च्या मोठ्या यशानंतरच तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी भारताला आण्विक राष्ट्र घोषित केले.

न्यूक्लियर क्लबमध्ये सामील होणारा भारत हा सहावा देश ठरला आहे. यासह भारत हा पहिला देश बनला आहे जो NPT (Non-Proliferation of Nuclear Weapons) चा भाग नव्हता. अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन यांनी स्वाक्षरी केलेला हा आंतरराष्ट्रीय करार होता. त्याचा उद्देश अण्वस्त्रांचा प्रसार रोखणे हा होता.

हा दिवस अणुचाचणीच्या यशाशी तसेच देशातील पहिल्या स्वदेशी विमानाच्या उड्डाणाशीही जोडला जातो. देशातील पहिले स्वदेशी विमान हंसा-3 बंगळुरूमध्ये उड्डाण करण्यात आले. हे विमान सामान्य दोन आसनी विमान होते. या विमानाचा वापर वैमानिक प्रशिक्षण, पाळत ठेवणे, हवाई छायाचित्रणासाठी करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: ठाण्यात मुसळधार पावसामुळे झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT