netflix and microsoft partnership working on cheaper ad based subscription plan model know details  
विज्ञान-तंत्र

नेटफ्लिक्सची मायक्रोसॉफ्ट सोबत भागीदारी, लवकरच मिळणार स्वस्त प्लॅन

सकाळ डिजिटल टीम

Netflix and Microsoft partnership : नेटफ्लिक्सच्या महागड्या सबस्क्रिप्शनमुळे बऱ्याच जणांना चांगले चित्रपट आणि वेब सीरिज पहाता येत नसतील तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. लवकरच कंपनी एक खास प्लॅन आणणार आहे, ज्यामुळे नेटफ्लिक्स कंटेंट पाहणे खूपच स्वस्त होईल. यासाठी नेटफ्रीक्स मायक्रोसॉफ्टसोबत भागीदारी केली आहे.

नेटफ्लिक्स आणि मायक्रोसॉफ्टच्या भागीदारीतून वापरकर्त्यांना मोठा फायदा मिळण्याची अपेक्षा आहे. कंपनी मायक्रोसॉफ्टसोबत आपली पहिली अॅड बेस्ड सब्स्क्रिप्शन प्लॅन आणण्याची तयारी करत आहे, ज्यामध्ये वापरकर्त्यांना चित्रपट आणि वेब सिरीज शो दरम्यान जाहिराती देखील दाखवल्या जातील.

दोन्ही कंपन्यांनी ब्लॉग पोस्टमध्ये या भागीदारीबद्दल माहिती दिली,

दोन्ही कंपन्यांनी आपापल्या ब्लॉग पोस्टमध्ये या भागीदारीबद्दल माहिती दिली आहे. नेटफ्लिक्सचे टेक्नोलॉजी आणि सेल्स पार्टनर बनण्यास उत्सुक असल्याचे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे. या भागीदारीनंतर नेटफ्लिक्सवर दाखवल्या जाणार्‍या सर्व जाहिराती मायक्रोसॉफ्ट प्लॅटफॉर्मवरून देण्यात येतील. तर मायक्रोसॉफ्टकडे नेटफ्लिक्सच्या वापरकर्त्यांचा एक्सेस असेल.

नेटफ्लिक्सने सांगितले की, त्याचे अॅड फ्री बेसिक, स्टँडर्ड आणि प्रीमियम प्लॅन नवीन आणि जुन्या वापरकर्त्यांसाठी पूर्वीप्रमाणेच उपलब्ध राहतील. मायक्रोसॉफ्टसोबतच्या भागीदारीबाबत, नेटफ्लिक्सचे सीओओ ग्रेग पीटर्स सागंतले की, हे सुरुवातीचे दिवस आहेत आणि काम करण्यासारखे बरेच काही आहे. परंतु आमचे दीर्घकालीन उद्दिष्ट स्पष्ट आहे. यात वापरकर्त्यांसाठी अधिक पर्याय आणि जाहिरातदारांसाठी प्रीमियम तसेच लीनीयर टिव्ही ब्रँडपेक्षा चांगला अनुभव देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितलं.

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार नेटफ्लिक्सने अॅड-बेस्ड मॉडेलसाठी वॉर्नर ब्रदर्स, युनिव्हर्सल आणि सोनी पिक्चर्स टेलिव्हिजन यांच्याशी चर्चा सुरू केली आहे. याचा अर्थ असा असू शकतो की नेटफ्लिक्सचे नवीन मॉडेल त्याच्या संपूर्ण कॅटलॉगला कव्हर करणार नाही, परंतु इन हाऊस प्रोडक्शन आणि मोठ्या हॉलीवूड स्टुडिओमधील काहींचा समावेश केला जाऊ शकतो. मात्र, ही केवळ अफवा असू शकते. याबाबत येत्या काही दिवसांत अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

डिसेंबर 2021 मध्ये स्वस्त केले होते प्लॅन्स

डिसेंबरमध्ये, Netflix ने भारतात सब्स्रिप्शन प्लॅनच्या किंमती 60% पर्यंत कमी केल्या आहेत. आता Netflix मोबाईल प्लॅन 199 रुपयांऐवजी 149 रुपये मासिक, बेसिक 199 रुपये मासिक, स्टँडर्ड 499 रुपये मासिक आणि प्रीमियम 649 रुपये मासिक असे करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGCA strict action against Indigo : ‘डीजीसीए’चा ‘इंडिगो’ला मोठा दणका!, हजारो उड्डाणे रद्द प्रकरणी केली कडक कारवाई

Ration Card Limit: गरजूंसाठी आनंदाची बातमी! रेशन कार्डसाठी उत्पन्न मर्यादा वाढवली; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Pune Traffic: सोमवारी पुण्यातले महत्त्वाचे रस्ते बंद! शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; 'हे' मार्ग टाळा अन् पर्यायी मार्ग बघा

IND U19 VS BAN U19: वैभव सूर्यवंशीने टीपला सूर्या दादासारखा कॅच; बांगलादेशच्या हातून खेचली मॅच, भारताचा रोमहर्षक विजय

Beed News : बीडमध्ये जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांचा मृतदेह कारमध्ये आढळला; वरिष्ठाच्या छळासंबंधित "लिहिलेली नोट" गाडीत सापडली!

SCROLL FOR NEXT