Netflix Stop Working old Amazon Fire TV Sticks esakal
विज्ञान-तंत्र

Netflix Stop Working : नेटफ्लिक्स युजर्ससाठी मोठी बातमी, 'या' टीव्ही अन् डिव्हाइसवर २ जूनपासून नेटफ्लिक्स सेवा बंद होणार!

Netflix Stop Working old Amazon Fire TV Sticks : नेटफ्लिक्स २ जूनपासून काही जुन्या Fire TV Stick डिव्हाइसेसवर सेवा बंद करणार आहे.

Saisimran Ghashi

Netflix Latest Update : नेटफ्लिक्स हा जगभरातील लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म असून कोट्यवधी लोक त्याच्या माध्यमातून मनोरंजनाचा आस्वाद घेतात. मात्र काही जुन्या डिव्हाइस वापरणाऱ्या नेटफ्लिक्स ग्राहकांसाठी एक चिंताजनक बातमी आहे.

2 जूनपासून नेटफ्लिक्स बंद!

नेटफ्लिक्सने जाहीर केले आहे की २ जून २०२५ पासून काही जुन्या Amazon Fire TV Stick डिव्हाइसेसवर त्यांची सेवा बंद केली जाणार आहे. याचा थेट परिणाम २०१४ ते २०१६ दरम्यान मार्केटमध्ये आलेल्या काही डिव्हाइसवर होणार आहे.

विशेषतः पहिल्या पिढीतील Fire TV Stick (2014), Fire TV (2014) आणि Alexa व्हॉईस रिमोटसह आलेला Fire TV Stick (2016) या डिव्हाइसेसवर नेटफ्लिक्सची सुविधा बंद होईल.

जर तुम्ही या डिव्हाइसच्या माध्यमातून नेटफ्लिक्स पाहत असाल, तर तुम्हाला तातडीने नवीन डिव्हाइस घेणे भाग पडेल. सध्या बाजारात नवीन Fire TV Stick उपलब्ध असून त्यामध्ये जास्त स्पीड, उत्तम पिक्चर क्वालिटी आणि नवनवीन फीचर्स देण्यात आले आहेत.

हे डिव्हाइस Amazon किंवा Flipkart वर सहज उपलब्ध आहे. याची किंमत साधारणतः ५००० ते ६००० दरम्यान आहे. याशिवाय सणासुदीच्या काळात आकर्षक डिस्काउंटही मिळू शकते.

नेटफ्लिक्सची सबस्क्रिप्शन फी कशी टाळायची?

जर तुम्ही नेटफ्लिक्सचा अमर्याद कंटेंट पाहण्यासाठी नवीन सबस्क्रिप्शन घेण्याचा विचार करत असाल, पण दरमहा होणारा खर्च टाळायचा असेल तर एयरटेलकडून एक बेस्ट पर्याय आहे.

एयरटेलचा १७९८ चा प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यामध्ये तुम्हाला ८४ दिवसांची वैधता, अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 एसएमएस, आणि 3GB डेटा प्रति दिवस मिळतो. या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्सचा अ‍ॅक्सेससुद्धा दिला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganesh Visarjan : पुण्यात गणपती मंडळांपुढे पोलिस हतबल, कार्यकर्त्यांनी भर गर्दीत उडविलले फटाके, विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Team India: करुण नायरसाठी कसोटी संघाचे दरवाजे होणार बंद? श्रेयस अय्यरबाबत 'तो' निर्णय घेत BCCI ने दिले मोठे संकेत

विसर्जन मिरवणुकीत कलाकारांना थारा नाही? DJ च्या धुमाकुळामुळे कलावंत पथकाचं वादन रद्द, चाहत्यांचा हिरमोड

Latest Maharashtra News Live Updates: मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आज पुण्यात

Satej Patil and Malojiraje : सतेज पाटील, मालोजीराजे भाजपच्या स्वागत कक्षात, राजेश क्षीरसागरांना पाहून सतेज पाटील हात पुढे करत म्हणाले, काळजी घ्या...

SCROLL FOR NEXT