Antarctica Alien UFO eSakal
विज्ञान-तंत्र

Antarctica Alien UFO : अंटार्क्टिकामध्ये दडलेत एलियन्स? गुगल मॅप्सवर यूएफओ दिसल्याच्या दाव्याने खळबळ

UFO Hidden in Antarctica : या तबकडीचा कथित फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. थिंक टँक नावाच्या एक्स (ट्विटर) हँडलवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे.

Sudesh

Antarctica UFO on Google Maps : पृथ्वीवर परग्रहवासी जीव म्हणजेच एलियन्स दिसल्याचे दावे कित्येक वेळा केले जातात. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील मायामी शहरामध्ये एलियन फिरत असल्याचा दावा केला जात होता. यातच आता अंटार्क्टिकामध्ये एक मोठा यूएफओ दडला असल्याचं म्हटलं जात आहे. गुगल मॅप्सवर ही उडती तबकडी दिसत असल्याचं सांगण्यात येतंय.

या तबकडीचा कथित फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. थिंक टँक नावाच्या एक्स (ट्विटर) हँडलवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये दिसणारी रहस्यमयी वस्तू म्हणजे 'यूएफओ'च आहे. 2011 सालापासून ही वस्तू त्याच ठिकाणी असून, त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही, असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. (Hidden UFO in Antarctica)

तर्क वितर्कांना उधाण

या दाव्यानंतर कित्येक तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. ही जर खरी तबकडी असती, तर गुगलने आतापर्यंत त्या गोष्टीला ब्लर केलं असतं असं एका एक्स यूजरने म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका यूजरने व्हिडिओच्या माध्यमातून ही वस्तू अजूनही तिथेच असल्याचं दाखवून दिलं. (Alien Visuals)

इतक्या वर्षांपासून ही वस्तू तिथेच असल्यामुळे हा बर्फाचा तुकडा तर नक्कीच नाही, यावर नेटिझन्सचं एकमत झालं. मात्र, बर्फ नाही तर ही गोष्ट काय आहे याबाबत अजूनही साशंकता आहे. हा कथित यूएफओ असणारी लोकेशन जिथे आहे, तिथून जवळच काही वर्षांपूर्वी शक्तिशाली मशीन्स पाहिल्या असल्याचा दावा अमेरिकेचे माजी नौसेना अधिकारी एरिक हेकर यांनी केला होता. या मशीन्स एलियन्ससोबत संपर्क साधण्यासाठी वापरल्या जात असल्याचं देखील या अधिकाऱ्याने म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

Pune Youth Murder in College Campus : पुण्यात खळबळ!, सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा तरूणाची कोयत्याने वार करून हत्या

Sheikh Hasina: शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; भारत आता त्यांना परत बांगलादेशात पाठवणार का? जाणून घ्या नियम...

Latest Marathi Breaking News:आदित्य ठाकरेंनी ट्विट करत केलं अमित ठाकरेंचं समर्थन

Kolhapur News: गोकुळच्या लिंगनूर कार्यक्रमात ‘लाडकी बहीण’ वरुन रंगले कलगीतुरे

SCROLL FOR NEXT