Old Vs New Car Purchase esakal
विज्ञान-तंत्र

Old Vs New Car Purchase : पहिली कार? जुनी खरेदी करावी की नवीन? या गोष्टींची घ्या काळजी...

पहिली कार खरेदी करताना कार जुनी घ्यावी की नवी कार घ्यावी यासाठी बजेट कमी असणे किंवा प्रतिष्ठा हीच

Lina Joshi

Old Vs New Car Purchase : पूर्वीच्या काळी दारात नवीन सायकल असणे प्रतिष्ठेच मानल जायचं, नंतर टूव्हीलर मोटरसायकलच्या बाबतीत,त्यानंतर चारचाकी बद्दल.पण अलीकडच्या वर्षांमध्ये नवीन पिढी अशा गोष्टींना बगल देत आहे.

पहिली कार खरेदी करताना कार जुनी घ्यावी की नवी कार घ्यावी यासाठी बजेट कमी असणे किंवा प्रतिष्ठा हीच कारणे असावीत असे काही नाही, काही जण नुकतीच कार शिकलेले असतात किंवा ते शिकणारे असतात.

तर काही जणांना चारचाकी हे depreciating asset वाटत असल्याने त्यांना कार मध्ये जास्त पैसे गुंतवायचे नसतात, पण कार घ्यायची असते कारण ती काळाची गरज बनली आहे. मुख्यत्वे या कोरोना काळात, कारण सार्वजनिक वाहतूक टाळणे हे सुरक्षिततेचा मुद्दा बनला आहे. 

पण पहिली कार खरेदी करताना मग ती जुनी कार घ्यावी की नवी कार घ्यावी असा सुध्दा प्रश्न पडतो. त्या अनुषंगाने आपण पाहू की नवीन कार घेण्याचे फायदे तोटे आणि जुनी कार घेण्याचे फायदे तोटे.

नवीन कार

फायदे

१. जर आपण कर्ज करून कार घेणार असू तर बँकेचा व्याजदर नवीन कारसाठी हा जुन्या कार पेक्षा कमी असतो.

२. नवीन कारचे मायलेज / एवरेज जुन्या कार पेक्षा जास्त असते.

३. मेंटेनन्स कमी येतो.

४. तुम्हाला गाडीचा कलर तुमच्या निवडीनुसार, मिळणारे फीचर्स, कारचे डिझाईन हे नवीन पद्धतीचे मिळते.

तोटे 

१. कारसाठीचे रेजिस्ट्रेशन, RTO टॅक्स , हे सर्व काही प्रथमतः आपल्यालाच करावे लागते.

२. नवीन कारचे पुन्हविक्री मूल्य पहिल्या पाच वर्षांमध्ये  लगेच कमी होत असते.

३. इन्शुरन्स ची किंमत सुरुवातीला जास्त भरावी लागते

जुनी कार

फायदे

१. तूम्हाला कोणतेही नवीन रेजिस्ट्रेशन किंवा टॅक्स भरावा लागत नाही. शो रुमच्या बऱ्याच चकरा देखील वाचतात.

२. रिसेलची प्राइज लगेच कमी होत नाही.

३. तुम्ही किती वर्ष जुनी कार घेता त्यावर तुमच्या इन्शुरन्स ची किंमत ठरते , तरी ती नवीन कारपेक्षा कमीच असते.

४. जर का तुम्ही एखाद्या कंपनीचं टॉप मॉडेल खरेदी केलं तर तुम्हाला कमी किमती मध्ये सध्या उपलब्ध असलेल्या सेकण्ड टॉप चे बरेच फिचर्स मिळतात.

५. Accessories साठी तुम्हाला जास्तीचा खर्च करावा लागेलच असे काही नाही.

६. जुन्या कारवर जर का इन्शुरन्स वरचा no claim bonus असेल तर तो तुम्ही तुमच्या कार वर ट्रान्स्फर करून पुढील हफ्ता म्हणजेच जुनी कार खरेदी केल्यापासून चा तुम्हाला इन्शुरन्स चा हफ्ता देखील कमीत कमी बसू शकतो.

तोटे

१. नवीन कारपेक्षा जुन्या कारला मायलेज कमी असते.

२. मेंटेनन्स जास्त येतो.

३. नवीन कारच्या तुलनेत जुन्या कारला फिचर्स हे कमी येतात.

४. गाडीचा कलर मध्ये तुम्हाला कलर निवडीची मुभा राहत नाही. 

५. गाडी accessories ह्या देखील जुन्याच मिळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT