Bounce Infinity Electric Scooter
Bounce Infinity Electric Scooter Google
विज्ञान-तंत्र

येतेय आणखी एक स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर; डिलिव्हरी 18 एप्रिलपासून

सकाळ डिजिटल टीम

देशात इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेता अनक स्टार्टअप कंपन्यांनी त्यांचे इलेक्ट्रिक स्कूटर्स बाजारात लॉंच केले आहेत. यातच बेंगळुरूस्थित इलेक्ट्रिक वाहन स्टार्ट-अप कंपनी बाउन्सने अधिकृतपणे त्यांच्या इन्फिनिटी E1 (Infinity E1) इलेक्ट्रिक स्कूटरचे राजस्थानमधील कारखान्यात उत्पादन सुरू केले आहे.

दरम्यान कंपनीच्या या प्लांटची उत्पादन क्षमता प्रतिवर्ष 2 लाख युनिट्स आहे. या वर्षाच्या शेवटी, कंपनीने दक्षिण भारतात आणखी एक कारखाना स्थापन करण्याची योजना आखली आहे ज्याची वार्षिक क्षमता 5 लाख स्कूटर आहे.

दरम्यान Infinity E1 ही एकमेव ई-स्कूटर आहे जी भारतात बॅटरी, चार्जर आणि बॅटरी-एज-ए-सर्व्हिस पर्यायांसह लॉन्च करण्यात आली आहे. बॅटरी आणि चार्जरसह बाउन्स इन्फिनिटी E1 इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 68999 रुपये आहे आणि बॅटरी सर्व्हिस पर्यायासह स्कूटरची किंमत 45099 रुपये आहे.

Bounce Infinity E1 पाच रंग पर्यायांमध्ये येते ज्यामध्ये स्पोर्टी रेड, स्पार्कल ब्लॅक, पर्ल व्हाइट, डॅसेट सिल्व्हर आणि कॉमेट ग्रे यांचा समावेश आहे. तसेच कंपनी सोबत 3 वर्षे किंवा 50,000 किमी पर्यंतची वॉरंटी देत ​​आहे.

बाउन्स इन्फिनिटी 39AH वॉटरप्रूफ IP67 रेटेड 48V बॅटरीसह येते जी 83Nm टॉर्क जनरेट करते. हे एका चार्जवर 65 किमी/तास या वेगाने 85 किमी अंतर कापू शकते. बाउन्स इन्फिनिटी 8 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग देखील गाठते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT