New Renault Duster SUV India Launch esakal
विज्ञान-तंत्र

New Renault Duster SUV India Launch : रेनो डस्टर येणार आता नव्या अवतारात, क्रेटा आणि ग्रँड विटाराचं वाढणार टेन्शन

भारतीय रस्त्यावर रेनो डस्टरचा जलवा

सकाळ डिजिटल टीम

New Renault Duster SUV India Launch : भारतात मिडसाइज एसयूव्ही सेगमेंटची टॉप सेलिंग ह्युंदाई क्रेटा आणि मारुती सुझुकी ग्रँड विटारा सोबत किआ सेल्टॉस, महिंद्रा स्कॉर्पियो एन आणि एक्सयूव्ही ७०० सारख्या पॉप्यूलर एसयूव्हीला टक्कर देण्यासाठी रेनो आगामी काळात नेक्स्ट जनरेशन डस्टर लाँच करण्याची तयारी करीत आहे.

जबरदस्त लूक आणि लेटेस्ट फीचर्स सोबत हायब्रिड पॉवरट्रेनची अपकमिंग डस्टरची लोकांना खूप उत्सूकता आहे. भारतीय रस्त्यावर रेनो डस्टरचा जलवा दिसत होता. परंतु, क्रेटा आणि नेक्सॉन सारख्या एसयूव्ही आल्यानंतर डस्टरची क्रेझ कमी झाली व नंतर तिची विक्री बंद करण्यात आली.

नेक्स्ट जनरेशन रेनो डस्टरला CMF-B मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर डेव्हलप केले जाईल. यात जास्त पॉवरफुल चेसिस सोबत सेफ्टी आणि कन्फर्ट वर जोर दिला जाईल. ही आपल्या सेगमेंट मध्ये बाकीच्या एसयूव्हीपेक्षा चांगली असेल. मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, यात हायब्रिड टेक्नोलॉजी दिली जाईल. आगामी काळात इंडियन मार्केटमध्ये डस्टरचे इलेक्ट्रिक व्हर्जन सुद्धा येऊ शकते.

अपकमिंग रेनो डस्टर मध्ये अडवॉन्स्ड टेक्नोलॉजी आणि लेटेस्ट स्टँडर्ड आणि सेफ्टी फीचर्स पाहायला मिळतील. नेक्स्ट जनरेशन डस्टर मध्ये वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिविटी सोबत मोठी टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, पॅनारमिक सनरूफ, वेंटिलेटेड सीट्स, वायरलेस चार्जर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, एअर प्यूरिफायर, एबीएस, ईएससी, व्हीकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, हिल होल्ड स्टार्ट आणि मल्टीपल एअरबॅग्स सोबत अडवॉन्स्ड ड्रायव्हर असिस्टेंट सिस्टम सारखे खास फीचर्स पाहायला मिळतील.

आगामी काळात रेनो डस्टरची इंडियन मार्केटमध्ये जोरदार एन्ट्री होणार, अशी माहिती येत आहे. संभावित किंमत याची १० लाख रुपयेहून जास्त असू शकते, असे बोलले जात आहे. २०१२ मध्ये रेनो डस्टरला इंडियन मार्केटमध्ये लाँच करण्यात आले होते. तसेच १० वर्षानंतर या कारची विक्री बंद करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT