New study finds more water ice on Moon ISRO Study marathi news  
विज्ञान-तंत्र

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

Water On Moon : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)ने चंद्राबद्दल मोठा खुलास केला आहे.

रोहित कणसे

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)ने चंद्राबद्दल मोठा खुलास केला आहे. इंस्त्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन केंद्र (SAC)च्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात चंद्राच्या ध्रुवीय भागात असलेल्या खड्ड्यांमध्ये बर्फाच्या रुपात पाण्याचे साठे असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. अपेक्षेपेक्षा हे बर्फाचे साठी अधीक असल्याची माहिती देण्यात आली आहे.

इंटरनॅशनल सोसाइटी फॉर फोटोग्रामेट्री अँड रिमोट सेंसिंग जर्नलमध्ये प्रकाशीत झालेल्या एका अभ्यासात याबद्दल माहिती देण्यात आली आहे. या अभ्यासानुसार चंद्राच्या पहिल्या काही मीटर्समध्ये भूपृष्ठावरील बर्फाचे प्रमाण उत्तरेकडील आणि दक्षिण ध्रुवीय प्रदेश या दोन्ही भागांवरील बर्फाच्या प्रमाणापेक्षा पाच ते आठ पट जास्त आहे. हा शोध भविष्यातील चंद्र मोहिमा आणि चंद्रावर दीर्घकालीन मानवी वास्तव्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

चंद्राच्या पृष्ठभागावरील बर्फाचा शोध हा भविष्यातील चंद्रावर पाण्याच्या शोधासाठी गेम चेंजर ठरू शकतो. यासोबतच, अभ्यासात असेही दिसून आले आहे की उत्तर ध्रुवीय प्रदेशात पाण्याच्या बर्फाचे प्रमाण दक्षिण ध्रुवीय प्रदेशापेक्षा दुप्पट आहे.

इस्त्रोचे स्पेस अॅप्लिकेशन सेंटर, आयआयटी कानपूर, युनिव्हर्सिची ऑफ साउदर्न कॅलिफोर्निया, जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी आणि आयआयटी-आयएसएम धनबाद येथील वैज्ञानिकांनी मिळून हा आभ्यास केला आहे. या अभ्यासानुसार चंद्राच्या पृष्टभागाच्या दोन ते चार मीटर खाली अपेक्षेपेक्षा जास्त बर्फ आढळला आहे.

चंद्राच्या ध्रुवांवर बर्फ कोठून आला?

या प्रश्नाचे उत्तर देताना इस्त्रोने सांगितले की, इंब्रियन काळात हे घडले आहे. तेव्हा चंद्र तयार होत होता. वॉल्कॅनिज्म म्हणजेच ज्वालामुखीच्या उद्रेकातून निघालेले वायू लाखो वर्ष हळूहळू खा जमीनीवर बर्फाच्या रुपात जमा होत गेले.

वैज्ञानिकांनी अमेरिकन लूनर रीकॉन्सेंस ऑर्बिटर (LRO) आणि चंद्रयान-२ च्या ऑर्बिटर आणि चंद्रयान २च्या ऑर्बिटरकडून मिळालेल्या डेटाचे अॅनालिसीस करण्यात आले. एलआरओचे रडारस लेजर, ऑप्टिकल, न्यूट्रॉन स्पेक्ट्रोमीटर, अल्ट्रा वॉयलेट स्पेक्ट्रोमीटर आणि थर्मल रेडियोमीटरवापरून डेटा घेण्यात आला. जेणेकरून चंद्रावर बर्फ पाण्याची उत्पत्ती, त्याची व्याप्ती आणि त्याचे विभाजन समजून घेता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईला जायचं फायनल! ४ मुक्काम, ५ दिवस; बीड-नगर-पुणे-मुंबई, कसा असेल मार्ग? जरांगेंनी सांगितला प्लान

Kolhapur Farmer Loan Waiver Second List : शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर! जिल्ह्यातील 3,833 शेतकऱ्यांना दिलासा; तुमचे नाव आहे का?

Rishi Panchami 2026: ऋषी पंचमी महिलांसाठी खास का असते? १०८ वेळा आघाड्याच्या काडीने दात घासण्यामागचं कारण काय?

Marathi News Live Updates : मुंबईत महिलांनी अमृताताई आणि लताताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावा : जरांगे पाटील

Nashik Police Bribery Case : लाचखोर हवालदाराला चार वर्षे सक्तमजुरीसह 5 हजार रुपये दंडाची शिक्षा; 10 हजारांची लाच स्वीकारताना पकडलेलं रंगेहाथ

SCROLL FOR NEXT