Nokia
Nokia Sakal
विज्ञान-तंत्र

Nokia Phone: स्वस्तात मस्त! अवघ्या १० हजारांच्या बजेटमध्ये आला नोकियाचा जबरदस्त स्मार्टफोन, पाहा फीचर्स

सकाळ डिजिटल टीम

Nokia C31 Launched: एचएमडी ग्लोबलने भारतात आपला बजेट स्मार्टफोन Nokia C31 ला लाँच केले आहे. या फोनची सुरुवाती किंमत ९,९९९ रुपये आहे. फोनमध्ये ६.६७ इंच एचडी डिस्प्ले आणि ३ दिवसांची दमदार बॅटरी लाइफ मिळते. फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यात अँड्राइड १२ आणि १२८ जीबीपर्यंत स्टोरेज दिले आहे. Nokia C31 च्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा : प्राप्तिकर- कशाने मिळेल सूट, कशावर भरावा लागेल कर....

Nokia C31 ची किंमत

Nokia C31 ला तुम्ही चारकोल, मिंट आणि सियान रंगात खरेदी करू शकता. फोनच्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ९,९९९ रुपये आहे. तर ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी तुम्हाला फक्त १०,९९९ रुपये खर्च करावे लागतील. फोनला नोकिया इंडियाच्या वेबसाइटवरून खरेदी करू शकतात.

हेही वाचा: Upcoming Smartphone: हातोड्यानेही फुटणार नाही 'हा' भन्नाट स्मार्टफोन, पाण्यातही वापरा; किंमत १५ हजारांच्या आत

Nokia C31 चे स्पेसिफिकेशन

Nokia C31 मध्ये ६.७४ इंच एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १६००x७२० पिक्सल आणि आस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. डिस्प्ले २.५ कर्व्ड ग्लास प्रोटेक्शनसह येतो. हँडसेटमध्ये ऑक्टाकोर यूनिसोक प्रोसेसरसह ४ जीबीपर्यंत रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजचा सपोर्ट मिळेल. फोन अँड्राइड १२ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. फोनमध्ये सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेंसरचा सपोर्ट मिळेल.

Nokia C31 चा कॅमेरा आणि बॅटरी लाइफ

फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात १३ मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, २ मेगापिक्सल मॅक्रो सेंसर आणि २ मेगापिक्सल डेप्थ सेंसर कॅमेऱ्याचा समावेश आहे. तर सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. यात पॉवर बॅकअपसाठी १० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, फोनला एकदा चार्ज केल्यानंतर बॅटरी ३ दिवस सहज टिकेल.

हेही वाचा: Smartphone Offer: iPhone ते Samsung... चक्क अर्ध्या किंमतीत मिळतायत बेस्टसेलर स्मार्टफोन, ऑफर घ्या जाणून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT