esakal
विज्ञान-तंत्र

4G अन् 5G नेटवर्क तर विसराच! 'या' देशात आजही वापरलं जातय 2G इंटरनेट, सरकारला द्यावा लागतो तुमच्या मोबाईलचा स्क्रीनशॉट

उत्तर कोरियातील नागरिक आजही 2G इंटरनेटवर अडकले असून त्यांना प्रत्येक तासाला स्क्रीनशॉट सरकारला पाठवावा लागतो. जग 6G च्या दिशेने वाटचाल करत असताना हा देश अजूनही डिजिटल टाळकुटेपणात अडकलेला आहे.

Saisimran Ghashi

जगभरात 5G नेटवर्क वाईडस्प्रेड झालं आहे, काही देशांनी 6G च्या चाचणीदेखील सुरू केल्या आहेत. पण आश्चर्यकारक म्हणजे, उत्तर कोरिया नावाचा एक देश आजही 2G किंवा फारतर 3G तंत्रज्ञानावर अडकून आहे. एवढंच नाही तर इंटरनेट वापरणाऱ्यांना दर तासाला स्वतःच्या मोबाईल स्क्रीनचे स्क्रीनशॉट सरकारला पाठवावे लागतात. सरकारच्या या कठोर नियमांमुळे नागरिकांचा डिजिटल जीवनावर खूप मोठा मर्यादा येते.

इंटरनेट नाही, इन्ट्रानेट

उत्तर कोरियामधील बहुतांश नागरिकांना जागतिक इंटरनेट वापरण्याची मुभा नाही. त्याऐवजी ते ‘क्वांगमयोंग’ (Kwangmyong) नावाच्या सरकार नियंत्रित इन्ट्रानेटचा वापर करतात. हे नेटवर्क पूर्णपणे देशांतर्गत असून त्यावर केवळ सरकारने मंजूर केलेली माहितीच उपलब्ध असते. त्यामुळे नागरिकांना कोणतीही परदेशी वेबसाईट, सोशल मीडिया किंवा बातम्या पाहता येत नाहीत.

दर तासाला सरकारला स्क्रीनशॉट पाठवण्याचा आदेश

जे थोडेफार नागरिक इंटरनेट वापरू शकतात, त्यांनाही पूर्णपणे मोकळं वाटत नाही. उत्तर कोरियामध्ये इंटरनेट वापरताना दर तासाला सरकारला आपली डिजिटल क्रियाकलापांची स्क्रीनशॉट्स पाठवणे बंधनकारक आहे. यामागे उद्देश असा आहे की कुणीही सरकारविरोधी विचारसरणी किंवा माहिती प्रसारित करत नाहीये, याची खात्री केली जावी.

स्मार्टफोनही फक्त निवडक लोकांकडेच

उत्तर कोरियात स्मार्टफोन मिळणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. बहुतांश लोक आजही 2G फीचर फोनवर अवलंबून आहेत. काही निवडक नागरिकांकडे स्मार्टफोन असले, तरी त्यांच्यावरही सरकारची सतत नजर असते. त्यांच्या कॉल्स, मेसेजेस आणि इंटरनेट ब्राउझिंगचे पूर्णपणे रेकॉर्ड घेतले जातात.

परदेशी माध्यमांवर पूर्ण बंदी

सामान्य नागरिकांना कोणताही विदेशी रेडिओ, टीव्ही चॅनल, सोशल मीडिया किंवा न्यूज पोर्टल पाहण्याची परवानगी नाही. ज्या काही लोकांनी अशा माध्यमांचा वापर करण्याचा प्रयत्न केला, त्यांना कठोर शिक्षा दिली जाते.

सायबर सुरक्षेच्या नावाखाली जनतेवर बंदी

उत्तर कोरियाच्या सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव अशा बंदी लादल्या असल्याचं सांगितलं जातं. परंतु अनेक आंतरराष्ट्रीय अहवालांनुसार, ही बंदी सरकारविरोधातील विचार प्रसार टाळण्यासाठी आणि पूर्णपणे जनतेला नियंत्रित ठेवण्यासाठी आहे. 2023 मध्ये WIRED ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात या देशातील कडक इंटरनेट सेन्सॉरशिप व गोपनीयतेच्या कमतरतेचा पर्दाफाश केला होता.

फॅशन आणि राहणीमानावरही लक्ष

फक्त इंटरनेटच नाही, तर नागरिकांच्या फॅशन, बोलणं, राहणीमान यावरही सरकारचं बारीक लक्ष असतं. कोणती हेअरस्टाईल ठेवायची, कोणते कपडे घालायचे, याचेही नियम आखून दिलेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Department: भ्रूणहत्येची माहिती द्या, एक लाखाचे बक्षीस घ्या, कन्या सन्मानदिनी आरोग्य विभागाचे आवाहन

'डार्लिंग, आय लव्ह यू' वीण दोघातली ही तुटेना मालिकेत स्वानंदींला ऐकू आले समरचे प्रेमळ शब्द, दोघांची पहिली भेट आणि...

Ajit Pawar: सरकारसोबत खासगी क्षेत्रही आरोग्यसेवेत पुढे यावे; दर्जेदार उपचार सुविधा उपलब्ध करण्याचे आवाहन : अजित पवार

Krishna Janmashtami 2025: जन्माष्टमीनिमित्त मथुरा-वृंदावनला चाललात? मग जाणून घ्या कसं होणार आहे कान्हाचं दर्शन!

वॉशिंग पावडर निरमा... साक्षी- प्रियाचा जेलमधील मारामारीचा सीन पाहून प्रेक्षक हसून बेजार; म्हणतात- यांची WWF लावली तर...

SCROLL FOR NEXT