google pixel  
विज्ञान-तंत्र

क्या बात है! आता स्मार्टफोनद्वारे चेक करा तुमचा हार्ट रेट; Google Pixel लवकरच आणणार फिचर 

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : जगात अशी कुठलीच गोष्ट नाही जी आपल्या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध नाही. अगदी सात समुद्रांपार पार असलेल्या व्यक्तींशी एका सेकंदात बोलणं असो की काही सेकंदात कोणाला पैसे पाठवणं असो स्मार्टफोननं आपलं जगणं सोपं केलंय. मात्र आता आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र हे खरंय.  Google Pixel या स्मार्टफोनबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. आपल्या ऍडव्हान्स आणि स्मार्ट फीचर्ससाठी हा फोन जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र आता या फोनमध्ये एक भन्नाट फिचर येणार आहे. ज्यामुळे या स्मार्टफोनच्या माध्यमातून तुम्ही तुमचा हार्ट रेट आणि रेस्पिरेटरी रेट मोजू शकणार आहात. कसा? याचबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Google Pixelच्या कॅमेरावून आता तुम्ही तुमचा हार्ट रेट आणि रेस्पिरेटरी रेट मोजू शकणार आहात अशी माहिती नुकतीच देण्यात आली आहे. हे फिचर लवकरच Google Pixelमध्ये येणार आहे. 

Google च्या Google Fit या अप्लिकेशनच्या माध्यमातून pixelमध्ये हे नवीन फिचर आणलं जाणार आहे. सॅमसंगच्या गॅलेक्सि सिरीजमध्ये सुद्धा हे फिचर देण्यात आलं होतं. कॅमेराजवळ देण्यात आलेल्या सेन्सरमुळे यात हार्ट रेट मॉनिटर करण्यास मदत होत होती. मात्र काही दिवसांनी सॅमसंगनं हे फिचर देणं बंद केलं. 

अशाच पद्धतीनं आता Google Pixelमध्येही हे फिचर येणार आहे. विशेष म्हणजे यासाठी स्मार्टफोनसोबत कुठल्याही एक्सटर्नल हार्डवेअरची गरज नसणार आहे. हे फिचर फोनमध्येच कॅमेराजवळ इनबिल्ड असणार आहे. 

google च्या म्हणण्यानुसार या नवीन फीचरमध्ये हार्ट रेट मॉनिटर करण्यासाठी कॅमेरा तुमच्या फिंगरप्रिंट्सच्या रंगांवर लक्ष ठेवणार आहे. तसाच रेस्पिरेटरी रेट मॉनिटर करण्यासाठी तुमच्या चेस्टवर नजर ठेवणार आहे. तुमच्या चेस्टला खाली-वर होताना या फीचरमध्ये बघितलं जाणार आहे. यामुळे तुमचे हार्ट रेट आणि रेस्पिरेटरी रेट मॉनिटर होणार आहेत. 

मात्र हे फिचर कुठल्याही मेडिकल कंडिशनला डाइग्नोज करत नाही. हे फिचर फक्त तुमच्या शरीरातील वेलनेस मॉनिटर करण्यासाठी आहे असंही गुगलकडून सांगण्यात आलं आहे. जसं डॉक्टर आपल्या रेस्पिरेटरी रेट बघण्यासाठी आपल्या चेस्टवर नजर ठेवतात तसंच हे फिचर ठेवणार आहे. 

मेडिकल टेक्नोलोंजि आणि या फिचरनुसार हार्ट रेट आणि रेस्पिरेटरी रेट मॉनिटर केल्यास रेस्पिरेटरी रेट सारखाच आला आहे. तर हार्ट रेटमध्ये मात्र २ टक्क्यांचा फरक आढळून आला आहे. या फीचरच्या अचूकतेच्या मुद्द्यावरूनच सॅमसंगनं हे फिचर बंद केलं अशीही चर्चा आहे. त्यामुळे आता हे नवीन फिचर अचूकच असेल यात शंका नाही. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate: कोकाटेंचं मंत्रिपद बीडच्या नेत्याला मिळणार? धनंजय मुंडेंना जबरदस्त धक्का देण्याची तयारी

ICICI Prudential AMC IPO : GMP मध्ये मोठी उसळी! ₹2535 वर उद्या लिस्टिंगची शक्यता; गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी?

Premanand Maharaj: विराट-अनुष्कासारखं प्रेमानंद महाराजांना भेटायचंय? जाणून घ्या खर्च किती

IND vs SA, 4th T20I: धुक्यामुळे सामना रद्द! मग फॅन्सला तिकीटांचे पैसे परत मिळणार की नाही? BCCI चा नियम काय?

Latest Marathi News Live Update : निवडणूक निकाल जवळ येताच शिंदे गट व भाजपाची धाकधूक वाढली; काँग्रेस शहराध्यक्ष दत्ता काकस यांची टीका

SCROLL FOR NEXT