train  
विज्ञान-तंत्र

आता प्रवासाला जाताना राहा बिनधास्त; घेऊ नका टेन्शन; तुमच्या Whats App वर येईल ट्रेनची सर्व माहिती 

सकाळ डिजिटल टीम

नागपूर: ट्रेनने  प्रवासाला जाताना अनेकदा आपली ट्रेन वेळेत आहे का? आतापर्यंत ट्रेन कुठे आहे? किती अंतर अजून जायचेय? याबद्दल आपल्याला नेहमीच चिंता असते. म्हणूनच आता Railofy याद्वारे आता तुम्हाला एक विशेष सुविधा मिळणार आहे. ही सेवा मुंबई बेस्ट स्टार्टअप कंपनी Railofy ने सुरू केली आहे. ज्याच्या मदतीने तुम्हाला रेल्वे प्रवासादरम्यान वास्तविक वेळेची अपडेट जाणून घेण्याची गरज नाही, पण Whats App वरच सर्व अपडेट मिळतील. चला ही सेवा कशी वापरावी ते जाणून घेऊया.

मुंबई बेस्ट स्टार्टअप कंपनी Railofy ने  प्रवाशांच्या सोयीसाठी ही सेवा सुरू केली आहे. या सेवेच्या सहाय्याने प्रवाशांना रेल्वे प्रवासाची माहिती Whats App वरच मिळणार आहे. तसेच पीएनआर स्टेटसबद्दलही माहिती मिळू शकेल. आपली ट्रेन कोणत्या वेळी पोहोचेल आणि किती उशीर झाला? Whats App मेसेजवरच तुम्हाला ही सर्व अपडेट्स मिळतील.

फक्त एक नंबर सेव्ह करा

ट्रेनची वास्तविक वेळ जाणून घेण्यासाठी आपल्याला फक्त आपल्या फोनमध्ये '+ 91-9881193322' नंबर सेव्ह करावा लागेल. यानंतर आपल्याला या क्रमांकावर 10-अंकी पीएनआर क्रमांक पाठवावा लागेल. ट्रेनशी संबंधित सर्व माहिती तुम्हाला पीएनआर पाठविल्यानंतर काही सेकंदातच संदेशाद्वारे उपलब्ध होईल.

Railofy ची वैशिष्ट्ये

Railofy या अप्लिकेशनमध्ये तुम्हाला ट्रेनशी संबंधित बरीच महत्वाची माहिती मिळेल ज्यामुळे तुम्हाला ट्रेनचे वास्तविक वेळेचे अपडेट कळतील. तसेच, जर तुम्हाला ही सेवा वापरणे थांबवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला फक्त STOP लिहून संदेश पाठवावा लागेल. त्यानंतर ते बंद होईल. गूगल प्ले स्टोअरवर Railofy अ‍ॅप विनामूल्य डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक कोंडी; दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा; तावडे हॉटेल चौकात गर्दी, वाहनधारक त्रस्त

Ganesh Naik Eknath Shinde : ‘बाटलीतली भूतं बाहेर काढली, आता अंगाशी येत आहेत’; गणेश नाईक-एकनाथ शिंदेंमधील वाद पुन्हा उफाळला

Kolhapur Politics: मंत्री हसन मुश्रीफ-डॉ. विनय कोरे यांच्यात खलबते; बंद दाराआड तासभर चर्चा, तपशील गुलदस्त्यात

IND vs SL Final: भारत-श्रीलंका फायनलमध्ये रंगणार थरार! शेफाली-दीप्ती ठरणार गेमचेंजर; आठव्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी

Kolhapur Accident: मृत्यूने गाठले, घर-संसाराचे स्वप्न अपूर्ण राहिले; प्लंबिंगचे साहित्य घेऊन येताना महेशच्या दुचाकीची थांबलेल्या टेम्पोला धडक

SCROLL FOR NEXT