Super Computer Esakal
विज्ञान-तंत्र

Supercomputer: आता होणार हवामानाची अचूक भविष्यवाणी; भारतात येणार 900 कोटींचे सुपर कम्प्युटर!

आतापर्यंत अमेरिका, ब्रिटन आणि जपान हे देश सुपर कॉम्प्युटरच्या मदतीने हवामानाची माहिती देत आलेत.

Sudesh

केंद्रीय पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालय किरेन रिजिजू यांनी सुपर कॉम्प्युटरसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की या वर्षाच्या अखेरीस भारताकडे 18 पेटाफ्लॉप सुपर कॉम्प्युटर असतील. या संगणकांच्या मदतीने हवामानाचा अचूक अंदाज बांधता येईल. त्यामुळे हवामानशास्त्राच्या क्षेत्रात भारत चीनला मागे टाकून मोठी कामगिरी करेल.

आतापर्यंत अमेरिका, ब्रिटन आणि जपान हे देश सुपर कॉम्प्युटरच्या मदतीने हवामानाची माहिती देत आलेत. पुढील वर्षी मार्चपासून भारतात देखील असेच सुपर कॉम्प्युटर येणार आहेत. त्यामुळे आपणही या देशांच्या बरोबरीने अचूक वेदर फॉरकास्ट करू शकणार आहे.

भारतात लवकरच येणार

MoES सचिव, एम रविचंद्रन यांनी 24 मे रोजी एका कार्यक्रमात माहिती दिली की, नवीन सुपरकॉम्प्युटर IITM आणि NCMRWF मध्ये ठेवले जातील. ही केंद्र पुणे आणि नोएडा येथे आहेत. रिजजू बुधवारी नोएडाच्या नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग (NCMRWF) ची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांनी 18 मे रोजी केंद्रीय पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाचा पदभार स्वीकारला आहे, त्यापूर्वी ते देशाचे कायदा मंत्री म्हणून कार्यरत होते.

सध्या भारताकडे 'प्रत्युष' आणि 'मिहिर' हे सर्वात शक्तिशाली नागरी सुपर कॉम्प्युटर आहेत. पण या वर्षाच्या अखेरीस देशाला उपलब्ध होणार्‍या 18 पेटाफ्लॉप सुपर कॉम्प्युटरची नावं अद्याप ठरलेली नाहीत. हे संगणक फ्रान्समधून आयात करण्यात येतील. केंद्र सरकारने डिसेंबर 2018 मध्ये फ्रान्ससोबत करार केला होता. या अंतर्गत भारत 2025 पर्यंत 4,500 कोटींचे उच्च-कार्यक्षमता असलेले संगणक खरेदी करणार आहे.

900 कोटी खर्च

भारताला लवकरच सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर मिळणार आहे. या शक्तिशाली सुपर कॉम्प्युटरची किंमत 900 कोटी आहे. या सुपर कॉम्प्युटरची क्षमता भारतातील सध्याच्या वेगवान सुपर कॉम्प्युटरपेक्षा तिप्पट असेल. सध्या भारतातील सुपर कॉम्प्युटर 12 किलोमीटरच्या रिझोल्यूशनसह हवामानाचा अंदाज लावतात. आणि नवीन सुपर कॉम्प्युटर 6 किमी रिझोल्यूशनसह तेच करेल. मिहीर आणि प्रत्युष नावाचे सुपर कॉम्प्युटर्स 2018 साली लाँच करण्यात आले. यासाठी 438 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. नवीन सुपर कॉम्प्युटर आल्यानंतर ते सिस्टमपासून वेगळे केले जातील.

अमेरिकेतील सुपर कम्प्युटर

अमेरिकेत सध्या सर्वात वेगवान कामगिरीसह सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटिंग प्रणाली आहे. त्याचे नाव Frontier-Cray System आहे आणि अमेरिकेच्या Oakridge National Laboratory मध्ये त्याची स्थापना झाली आहे. त्याची कमाल गती 1 एक्सा-फ्लॉप (किंवा सुमारे 1,000 पेटाफ्लॉप) आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT