Chandrayaan 3 Update eSakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan 3 : चंद्राच्या जवळ पोहोचलं; मात्र अजूनही 'चांद्रयान-3'च्या मार्गात भरपूर अडथळे! कसं होणार लँडिंग?

Moon Traffic Jam : चंद्राच्या कक्षेमध्ये खरतंर इतर उपग्रह आणि बाकी गोष्टींमुळे ट्रॅफिक जॅम असल्यासारखी परिस्थिती आहे.

सकाळ डिजिटल टीम

चांद्रयान-3 चंद्राच्या अगदी जवळ पोहोचलं आहे. आता गुरुवारी (17 ऑगस्ट) चांद्रयानाचं लँँडर हे प्रॉपल्शन मॉड्यूलपासून वेगळे होऊन चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करेल. हे बोलायला जरी सोपं वाटत असलं तरी ते म्हणावं तितकं सोपं नाहीये.

याला कारण म्हणजे, चांद्रयान-3 हे चंद्राच्या कक्षेत एकटंच नाहीये. चंद्राच्या कक्षेमध्ये खरतंर इतर उपग्रह आणि बाकी गोष्टींमुळे ट्रॅफिक जॅम असल्यासारखी परिस्थिती आहे. चांद्रयान-3 व्यतिरिक्त भारताचे चांद्रयान-2 ऑर्बिटर, नासाचे ऑर्बिटर, नासाच्या थेमिस मिशनचे दोन ऑर्बिटर आणि कोरिया पाथफाइंडर लुनार ऑर्बिटर आणि नासाचे कॅपस्टोन अशी कित्येक ऑर्बिटर्स या कक्षेत फिरत आहेत.

चांद्रयान-3 पुढे कसं जाणार?

17 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 पासून प्रोपल्शन मॉड्यूल वेगळे केले जाईल, आणि फक्त लँडर आणि रोव्हर पुढचा प्रवास करतील. प्रोपल्शन मॉड्यूल वेगळे केल्यानंतर चांद्रयान-3 त्याचा वेग नियंत्रित करेल आणि चंद्रावर सॉफ्ट लँडिंगची प्रक्रिया सुरू करेल. ते 23 ऑगस्ट रोजी सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल. (ISRO Moon Mission)

पुढचा प्रवास किती कठीण?

चांद्रयान-3 शेवटच्या मुक्कामाकडे वाटचाल करत आहे, पण त्याचा प्रवास सोपा नाही. खरं तर, नासाचे एक ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत 50X200 किमी उंचीवर फिरत आहे, ते चंद्राच्या पृष्ठभागाचे नकाशे तयार करण्यासाठी इतक्या उंचीवर फिरत आहे. हे जून 2009 मध्ये लाँच करण्यात आले होते.

याशिवाय NASA ने 2011 मध्ये आर्टेमिस P-1 आणि P-2 देखील चंद्राच्या कक्षेत पाठवले होते. 2019 मध्ये भारताने प्रक्षेपित केलेले चांद्रयान-2 चे ऑर्बिटर अजूनही कार्यरत आहे आणि चंद्राच्या कक्षेत फिरत आहे. हे सध्या चंद्राच्या 100 किमी कक्षेत सक्रिय आहे. याशिवाय कोरिया पाथफाइंडर लुनार आणि कॅपस्टोन देखील याच्याच आजूबाजूच्या कक्षेत सक्रिय आहेत.

दक्षिण ध्रुवावर उतरेल

चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. येथे लँडिंग करणे हे एक मोठे आव्हान आहे, ते इस्रोसाठी अधिक आव्हानात्मक आहे कारण 2019 मध्ये विक्रम लँडर दक्षिण ध्रुवावरच उतरण्याच्या प्रयत्नात क्रॅश झाले होते. यावेळी चांद्रयान-3 सोबत पाठवलेल्या लँडरचे नाव देखील विक्रमच आहे. तर लँडरमधील रोव्हरचे नाव प्रज्ञान आहे, जो चंद्राच्या पृष्ठभागावर प्रवास करेल आणि माहिती गोळा करेल आणि पृथ्वीवर पाठवेल.

आता गर्दी आणखी वाढणार

चंद्राच्या कक्षेतील गर्दी आणखी वाढणार आहे, खरं तर रशियाचं लुना-25 यान आज किंवा उद्या थेट चंद्राच्या कक्षेत पोहोचेल आणि चांद्रयानासह चंद्राच्या कक्षेत पुढे जाईल. विशेष म्हणजे रशियाचे लुना-25 हे देखील भारताच्या चांद्रयान-3 प्रमाणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. याशिवाय नासाचा आर्टेमिस कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे, ज्यामुळे चंद्राच्या कक्षेत गर्दी आणखीच वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT