Old car can be converted into electric Car
Old car can be converted into electric Car Sakal
विज्ञान-तंत्र

जुन्या अन् रजिस्ट्रेशन रद्द झालेल्या कारला इलेक्ट्रीक कारमध्ये बदला; जाणून घ्या डिटेल्स

सकाळ डिजिटल टीम

डिझेल किंवा पेट्रोलवर चालणारी जुनी वाहने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये (Electric Vehicle) बदलून पुन्हा रस्त्यावर धावू शकतात. याची सर्व माहिती घरबसल्या उपलब्ध होणार आहे. दिल्ली सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या जुन्या वाहनांना इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतरित करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देणार आहे. एनआयसीच्या सहकार्याने परिवहन विभाग यासाठी एक सॉफ्टवेअर विकसित करत आहे. याद्वारे जुन्या वाहनांचे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतर करणाऱ्या कंपन्यांकडून उत्पादन, किंमत आणि आरटीओ नोंदणीपर्यंतची माहिती उपलब्ध होणार आहे. परिवहन विभागाच्या या उपक्रमाचा लाखो वाहनधारकांना फायदा होणार आहे.

गतवर्षी मिळाली होती मंजूरी-

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, दिल्ली सरकारने 10 वर्षे जुनी डिझेल आणि 15 वर्षे जुनी पेट्रोल वाहने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बदलून रस्त्यावर चालविण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर याबाबत परिवहन विभागात प्रश्नांची सरबत्ती होत होती. कारण, आतापर्यंत दिल्लीत अशी कोणतीही बाजारपेठ नाही, जिथे जुनी वाहने ई-कारमध्ये बदलता येतील. अशा वाहनधारकांना एकाच प्लॅटफॉर्मवर बसवण्यासाठी परिवहन विभागाने हा पुढाकार घेतला आहे. या संदर्भात विभागाने आतापर्यंत 11 कंपन्यांची यादी केली आहे. इलेक्ट्रिक किट उत्पादक, वितरक, किट इंस्टॉलेशन केंद्रे आणि वाहनांमध्ये इलेक्ट्रिक रिट्रोफिटमेंट करणाऱ्या कंपन्या ऑनलाइन पोर्टलद्वारे एकाच ठिकाणी उपलब्ध असतील.

ई-वाहनांची वाढती संख्या-

परिवहन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वाहनातील इलेक्ट्रिक किटचे रिट्रोफिटमेंट केल्यानंतर वाहनधारकाला स्वत: आरटीओ नोंदणीसाठी जावे लागणार नाही, अशी सुविधाही ऑनलाइन पोर्टलद्वारे उपलब्ध होणार आहे. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, 15 जूननंतर पोर्टल सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. दिल्लीत ई-वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे. मे 2022 पर्यंत दिल्लीत 1.48 लाख ई-वाहनांची नोंदणी झाली आहे. 2022 मध्ये, नोंदणीकृत एकूण वाहनांपैकी 9.3 टक्क्यांपेक्षा जास्त ई-वाहने आहेत.

  • गेल्या पाच वर्षांतील हा उच्चांक आहे.

  • दिल्लीत आतापर्यंत 1.48 लाख ई-वाहनांची नोंदणी झाली आहे

  • 2022 मध्ये एकूण नोंदणीकृत वाहनांपैकी 9.3 टक्के ई-वाहने

  • 2018 मध्ये ई-वाहनांमध्ये नोंदणीकृत एकूण वाहनांपैकी 2.3 टक्के

  • 18 नोव्हेंबर 2021 रोजी जुन्या वाहनांचे ई-कारमध्ये रूपांतर करण्यास मंजुरी देण्यात आली.

  • परिवहन विभागाने 11 कंपन्यांची यादी केली आहे.

एक लाखाहून अधिक वाहनांची नोंदणी रद्द करण्यात आली -

दिल्लीतील 10 वर्षे जुन्या डिझेल आणि 15 वर्षे जुन्या पेट्रोल वाहनांवर सरकारने कडक कारवाई केली आहे. अशा वाहनांची नोंदणी वेळोवेळी रद्द केली जात आहे. त्यांना ना-हरकत प्रमाणपत्र घेऊन दुसऱ्या राज्यात नेण्यास किंवा ते रद्द करण्यास सांगितले जात आहे. या वर्षी 1 जानेवारी 2022 पर्यंत दिल्लीत 1.01 लाखांहून अधिक वाहनांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. ही सर्व डिझेल वाहने आहेत, ज्यांची 2007 ते 2011 दरम्यान नोंदणी झाली होती.

किती खर्च येईल-

जुन्या डिझेल किंवा पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतरित करण्यासाठी तीन ते पाच लाख रुपये खर्च येतो. हे दर वाहनात लावलेली मोटर, कंट्रोलर, रोलर आणि बॅटरीवर अवलंबून असतात. त्याच्या गुणवत्तेनुसार किंमती निश्चित केल्या जातात. मोटार आणि बॅटरीची किलोवॅट क्षमता वाढल्याने किंमतही वाढते.

या सुविधा पोर्टलवर उपलब्ध असतील

ऑनलाइन पोर्टलवर, लोकांना पुरवठादार, निर्माता आणि रेट्रोफिटमेंट कंपनी एकाच ठिकाणी मिळेल. चालकांना विविध कंपन्यांची उत्पादने आणि त्यांच्या किमती एकाच ठिकाणी पाहता येणार आहेत. त्यांचा निर्माता कोण आहे, याचीही माहिती मिळणार आहे. याशिवाय कोणत्या कंपन्या त्या इंस्टॉल करणार आहेत, त्यांची केंद्रे कुठे आहेत, ही सर्व माहिती पोर्टलवर उपलब्ध होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

Viral Video: शिक्षिकेला शाळेत उशिरा येणे पडलं महागात, मुख्याध्यापिकेने केली मारहाण, कपडेही फाडले

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT