Cryptocurrency sakal
विज्ञान-तंत्र

ओमिक्रॉन क्रिप्टोकरन्सी तेजीत; दोन दिवसात 900 टक्क्यांहून अधिक वाढ

सकाळ डिजिटल टीम

23 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत प्रथम आढळलेला नवीन कोविड-19 व्हेरिएंटला ओमिक्रॉन (Omicron) असे नाव दिले आहे. दरम्यान सध्या याच नावाचे Omicron या इथरियम-आधारित क्रिप्टोकरन्सी (Omicron Cryptocurrency) टोकनची किंमत 945 टक्क्यांनी वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ग्रीक वर्णमालेच्या पंधराव्या अक्षरावरून वेगाने पसरणाऱ्या B.1.1.529 या स्टेनला हे नाव दिले आहे. विशेष म्हणजे, या नवीन कोविड व्हेरिएंटमुळे बहुतांश क्रिप्टोकरन्सीला फटका बसला आहे, Bitcoin आणि Ethereum दोन्हींच्या किंमती घसरल्या असून, इतरांनी देखील फटका बसला आहे. मात्र या व्हेरिंएंटचे नाव असलेले क्रिप्टोकरंसी मात्र गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देत आहे.

हे टोकन नोव्हेंबरच्या सुरुवातीस तयार करण्यात आले असून त्याची किंमत वाढण्याचे एकमेव कारण हे त्या टोकनचे नाव हे कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या नावात समानता असणे हे आहे. CoinGecko च्या मते, सध्या Omicron हे क्रिप्टो टोकन, ज्याला OMIC असे देखील म्हटले जाते, याची किंमत $576.48 (अंदाजे रुपये 43,311) आहे.

मात्र दोनच दिवसांपूर्वी हेच Omicron टोकन $ 65 (सुमारे 4,883 रुपये) वर व्यवहार करत होते. त्यानंतर दोन दिवसांत, याची किंमत $689 (सुमारे 51,765 रुपये) च्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटी एकूण क्रिप्टो मार्केट क्रॅश होऊनही ओमिक्रॉन टोकनच्या किंमतीमध्ये मोठी वाढ दिसून आली.

ओमिक्रॉन कदाचित नवीन उंची गाठत असताना कोविडच्या नवीन व्हेरिएंटशी त्याचे विचित्र कनेक्शन ऑनलाइन जगामध्ये चर्चेचा विषय आहे. 23 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून या व्हेरिएंटची नोंद करण्यात आली होती. दरम्यान कोरोनाचा हा व्हेरिएंट WHO ने चिंतेचा विषय असल्याचे घोषित केले आहे.

सध्या OMIC चा ट्रेड फक्त SushiSwap वर केली जाऊ शकते जे एक डीसेंट्रलाईज्ड एक्सचेंज आहे. Coingecko च्या मते, Omicron टोकनचा एकूण पुरवठा सध्या $2,430 आहे, ज्याची किंमत $1.4 मिलीयन (अंदाजे रु. 10 कोटी) आहे.

या क्रिप्टो टोकनचा एकूण पुरवठा 10 लाख इतका मर्यादित आहे. त्‍यामुळे त्‍यातील बहुतांश टोकन अजूनही माईनींग आणि ट्रेडिंग करण्‍यासाठी शिल्लक आहेत. सध्याचे मार्केट कॅप आणि OMIC टोकन्सचा पुरवठा यासंबंधीचे तपशील अस्पष्ट आहेत.

जागतिक स्तरावर ट्रेंडिंग असलेल्या घटनेतून क्रिप्टोकरन्सीने एका रात्रीत मोठ्या प्रमाणात नफा मिळवल्याची अलीकडच्या काही दिवसांतील ही दुसरी घटना आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला, लोकप्रिय Netflix मालिका Squid Game कडून प्रेरणा घेत SQUID नावाच्या क्रिप्टोकरन्सीची किंमत 600 टक्क्यांनी वाढली होती. त्यानंतर तो 99.99 टक्क्यांनी घसरला आणि गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Warren Buffett: वॉरेन बफेंसारखी गुंतवणूक करायला शिका; कमवाल करोडो रुपये, काय आहे त्यांची स्ट्रॅटेजी?

HBD MS Dhoni: एमएस धोनीच्या नावावर असलेले असे ५ रेकॉर्ड जे मोडणं कोणालाही आहे महाकठीण

Chandrakant Patil: पुणे पोलिस दलात लवकरच एक हजार जणांना घेणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती

11th Class Admission: अकरावीच्या प्रवेशासाठी आज अखेरची संधी; ३२ हजार विद्यार्थ्यांनी निश्चित केला प्रवेश

Solapur News: 'मुख्यमंत्र्यांसमवेत कल्याणशेट्टी अन्‌ मानेंची चर्चा'; माजी खासदार थांबले काही अंतरावर, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT