Oneplus 13 Price : वनप्लसने आपल्या नवीन स्मार्टफोन OnePlus 13R च्या वैशिष्ट्यांची माहिती जाहीर केली असून, हा फोन 7 जानेवारी 2025 रोजी भारतात लाँच होणार आहे. Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर, 6000mAh बॅटरी, आणि आकर्षक डिझाइनसह हा फोन मध्यम किमतीच्या श्रेणीत मोठा बदल घेऊन येणार आहे.
OnePlus 13R Snapdragon 8 Gen 3 चिपसेटवर चालणार असून, त्यामध्ये 6000mAh क्षमतेची बॅटरी असणार आहे. SuperVOOC फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानामुळे हा फोन लवकर चार्ज होईल. यापूर्वीच्या OnePlus 12R मध्ये 5500mAh बॅटरी होती, त्यामुळे ही बॅटरी मोठी सुधारणा मानली जात आहे.
OnePlus 13R मध्ये 50 मेगापिक्सल्सचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असून, तो उच्च दर्जाची छायाचित्रे आणि व्हिडिओ घेण्यासाठी सक्षम असेल. सेल्फी कॅमेरा सेंटरला पUNCH-होल डिझाइनमध्ये आहे.
फोनचे डिझाइन यावेळी अधिक स्टायलिश असून, बॉक्सी चेसिससह मऊ गोलाकार कोपरे, गोरिल्ला ग्लास 7i चा वापर आणि 8mm जाडीचे अल्युमिनियम फ्रेम यामुळे फोनचा लुक अधिक आकर्षक आहे.
वनप्लसच्या या नव्या फोनमध्ये AI Notes, AI Cleanup, AI Imaging Power आणि Intelligent Search यांसारख्या प्रगत AI फीचर्सचा समावेश असेल. तसेच, Snapshot फीचर कॅमेराला आणखी उपयुक्त बनवेल.
OnePlus 13R दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल. Nebula Noir आणि Astral Trial. या फोनची किंमत रु. 45,000 च्या आत असण्याची शक्यता आहे.
दमदार प्रोसेसर, मोठी बॅटरी, प्रगत कॅमेरा, आणि स्टायलिश डिझाइन यामुळे OnePlus 13R मध्यम किमतीच्या स्मार्टफोनसाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे. OnePlus 13R च्या लॉन्चसाठी सर्व तंत्रज्ञानप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.