My Fashion GPT eSakal
विज्ञान-तंत्र

Fashion Chatbot : ऑनलाईन शॉपिंगला मदत करेल एआय चॅटबॉट; कपड्यांपासून अ‍ॅक्सेसरीजपर्यंत देईल उत्तम सल्ले

MyFashionGPT : माय फॅशन जीपीटी हा चॅटबॉट तुमच्या गरजेनुसार तुम्हाला योग्य असे कपडे सजेस्ट करतो. यामुळे लाखो ऑप्शन्समधून कपडे निवडण्यात तुमचा वेळ जात नाही.

Sudesh

Online Shopping Tips : आजकाल सर्व ठिकाणी एआयचा वापर सुरू झाला आहे. आपली कामं सोपी करण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर होतोय. यामुळेच कित्येक टेक कंपन्या आणि वेबसाईट्स आपल्या ग्राहकांसाठी एआय फीचर्स लाँच करत आहेत. लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाईट 'मिंत्रा'नेही आपल्या यूजर्सच्या मदतीसाठी एक एआय चॅटबॉट लाँच केला आहे.

मिंत्राच्या एआय चॅटबॉटचं नाव MyFashionGPT असं आहे. मिंत्रा ही ई-कॉमर्स साईट कपडे आणि अ‍ॅक्सेसरीजसाठी ओळखली जाते. संपूर्णपणे फॅशनसाठी डेडिकेटेड असणाऱ्या या प्लॅटफॉर्मवर आता तुम्हाला फॅशन टिप्स देखील मिळणार आहेत. मिंत्राचा हा एआय चॅटबॉट तुम्हाला शॉपिंग करताना फायद्याचा ठरेल.

कसा करतो काम?

माय फॅशन जीपीटी हा चॅटबॉट तुमच्या गरजेनुसार तुम्हाला योग्य असे कपडे सजेस्ट करतो. यामुळे लाखो ऑप्शन्समधून कपडे निवडण्यात तुमचा वेळ जात नाही.

यासाठी तुम्हाला MyFashionGPT मध्ये आपलं प्रॉम्प्ट एंटर करावं लागेल. म्हणजे, तुम्हाला जर कॉलेज फंक्शनसाठी एखादा आउटफिट हवा असेल, तर Show me men/women outfit for college function अशी आज्ञा या चॅटबॉटला देऊ शकता.

यानंतर हा चॅटबॉट तुम्हाला कपडे, फुटवेअर, अ‍ॅक्सेसरीज आणि मेकअप प्रॉडक्ट्सची देखील माहिती देईल.

हा चॅटबॉट वापरण्यासाठी तुम्हाला वेगळं अ‍ॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही. मिंत्राच्या अ‍ॅपमध्येच तुम्हाला हा चॅटबॉट मिळेल.

केवळ कपड्यांसाठीच नाही, तर अ‍ॅक्सेसरीज, मेकअप आणि इतर गोष्टींबाबत देखील तुम्ही या चॅटबॉटकडे टिप्स मागू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT