Open AI Board Members eSakal
विज्ञान-तंत्र

Open AI Board Members : अल्टमन यांना कंपनीतून काढणाऱ्या तीन जणांची बोर्डावरुन हकालपट्टी; Open AI कंपनीचा मोठा निर्णय

Sam Altman Open AI : कंपनीने आपल्या बोर्डावर तीन नव्या सदस्यांची नियुक्ती केली आहे.

Sudesh

Open AI Sacks Board Members : चॅटजीपीटी बनवणाऱ्या ओपन एआय कंपनीमध्ये बदलाची लाट अजूनही थांबलेली नाही. काही दिवसांपूर्वी कंपनीने संस्थापक-सीईओ सॅम अल्टमन यांना काढून टाकलं होतं. यानंतर कर्मचाऱ्यांच्या दबावामुळे कंपनीने पुन्हा त्यांना सीईओ पदी नियुक्त केलं. यानंतर आता अल्टमन यांना कंपनीतून काढणाऱ्या तीन सदस्यांची बोर्डावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

यासोबतच कंपनीमध्ये तीन नव्या बोर्ड मेंबर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच, कंपनी बोर्डाचे अध्यक्ष देखील बदलण्यात आले आहेत. नव्या बोर्डाचे अध्यक्ष हे ब्रेट टेलर असणार आहेत. ब्रेट हे यापूर्वी एक्स (ट्विटर) कंपनीत काम करत होते. ते सध्या शॉपिफाय या कंपनीच्या बोर्डावर देखील कार्यरत आहेत. यासोबतच नव्या बोर्डामध्ये लॅरी समर्स आणि एडम डी. एँजेलो यांचा समावेश आहे.

लॅरी समर्स अमेरिका सरकारचे माजी ट्रेजरी सचिव राहिले आहेत. तसंच राष्ट्रीय आर्थिक परिषदेचे डिरेक्टर देखील होते. एडम डी. एँजेलो हे कोरा या वेबसाईटचे सह संस्थापक आणि सीईओ आहेत. यापूर्वी त्यांनी मेटाचे सीटीओ म्हणूनही काम पाहिलं आहे. (Tech News)

तीन सदस्यांची हकालपट्टी

ओपनएआय कंपनीने सॅम यांच्या हकालपट्टीस होकार दर्शवणाऱ्या तीन बोर्ड मेंबर्सचं सदस्यत्व काढून घेतलं आहे. यामध्ये हेलेन टोनर, ताशा मॅककॉली आणि इल्या सुतस्केवर या सदस्यांचा समावेश आहे. अर्थात, या तिघांनी अद्याप कंपनी सोडल्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

सॅम अल्टमन येणार बोर्डावर?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीच्या बोर्ड सदस्यांची संख्या वाढवून 9 करण्याचा विचार सुरू आहे. यामध्ये कंपनीचा सर्वात मोठा गुंतवणूकदार असणाऱ्या मायक्रोसॉफ्टमधील एका सदस्याचा समावेश होण्याची शक्यता आहे. तसंच सॅम अल्टमन यांचीदेखील सदस्यपदी निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कांदा उत्पादकांची व्यथा! एकरी खर्च १ लाख, उत्पन्न ६३ हजार; नफा राहुदे, स्वत:चेच ४० हजार खर्च

Mumbai Pune Expressway: पुन्हा टँकर उलटला तर एअरलिफ्ट करणार, चाचणी सुरू; मंत्र्यांनी दिले अपडेट

Latest Marathi News Update : सांगलीत औषधांच्या नावाखाली गोवा बनावट देशी दारूची तस्करी

Marriage Astrology : 'या' महिन्यात जन्मलेल्या व्यक्तीनी अजिबात करू नये 'सिंह' राशीवाल्यांशी लग्न; नाहीतर लग्न अजिबात टिकणार नाही

कश्मीरमध्ये फिरायला जाण्यासाठी नीना गुप्ता यांनी केलेलं लग्न, 'या' कारणामुळे मोडलं Delhi IITमध्ये शिकणाऱ्या मुलासोबतचं नातं!

SCROLL FOR NEXT