Opera GX Fake My History eSakal
विज्ञान-तंत्र

Fake My History : तुमच्या मृत्यूनंतर तुमची ब्राउजिंग हिस्ट्री आपोआप होणार 'पवित्र'; ऑपेराने लाँच केलं खास फीचर!

Opera GX : आपल्या ब्राउजिंग हिस्ट्रीवरुन आपली नको ती बाजू सर्वांना कळेल, अशी भीती बऱ्याच जणांना असते.

Sudesh

Browser History : आपलं खरं रुप हे आपल्या ब्राउजिंग हिस्ट्रीमध्येच दिसून येतं. कित्येक जणांचे दाखवायचे दात वेगळे असले, तरी खायचे दात हे त्यांच्या इंटरनेट सर्च हिस्ट्रीमधून दिसून येतातच. यामुळेच आपल्या मृत्यूनंतर आपली सर्च हिस्ट्री कोणी पाहू नये असंच बऱ्याच जणांना वाटत असतं.

ब्राउजिंग हिस्ट्री डिलीट न करताच आपला मृत्यू झाला तर? अशी भीती कित्येकांना सतावत असते. तुम्हालादेखील हाच प्रश्न पडला असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ऑपेरा जीएक्स या ब्राउजरने यासाठी एक खास फीचर लाँच केलं आहे. या माध्यमातून तुमची ब्राउजिंग हिस्ट्री ही पवित्र होणार आहे.

काय आहे फीचर?

ऑपेरा GX ब्राउजरने फेक माय हिस्ट्री नावाचं हे फीचर लाँच केलं आहे. हे फीचर तुमच्या ब्राउजिंग हिस्ट्रीमधील सर्च रिझल्ट आपोआप बदलतं. यामध्ये मग तुम्ही सर्च केलेल्या गोष्टी काढून, त्याठिकाणी 'चांगला पती कसं बनावं', 'स्वतःच्या मानसिक वृद्धीसाठी ऑनलाईन कोर्स', अशा चांगल्या चांगल्या गोष्टी त्याठिकाणी अ‍ॅड केल्या जातात. (Tech News)

असं करतं काम

तुम्ही जर ऑपेरा जीएक्स ब्राउजर दररोज वापरत आहात, आणि अचानक १४ दिवस तुम्ही ते वापरलं नाही; तर तुमचा मृत्यू झाला आहे असं हे ब्राउजर समजतं. यानंतर तुमच्या सर्च हिस्ट्रीमधील आक्षेपार्ह यूआरएल बदलून त्याजागी वर सांगितल्याप्रमाणे चांगल्या-चांगल्या लिंक्स टाकल्या जातात.

विविध पर्याय उपलब्ध

हे फीचर अनिवार्य नसून, यूजरला हवं असल्यास ते बंद करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. यासोबतच ऑपेराने "Pretend I'm Already Dead" असाही एक पर्याय यात दिला आहे. हा पर्याय इनेबल केल्यास तुमची ब्राउजिंग हिस्ट्री दररोजच 'शुद्ध' केली जाईल. ऑपेरा GX चे प्रॉडक्ट डिरेक्टर मॅकिएज कोसेम्बा यांनी याबाबत माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Pass : एकाच महिन्यात 5 लाख विद्यार्थ्यांना शाळेत मिळाले एसटी पास; कोणाला मिळतो सवलतीचा पास? वाचा...

Indian Women Cricket Team: भारतीय महिला संघ आज रचणार इतिहास; T20 मालिका जिंकण्याची संधी

"निलेश तू कसा आहेस माहितीये..." साबळेंच्या व्हायरल व्हिडिओनंतर मराठी अभिनेता झाला व्यक्त ; म्हणाला..

Sonipat Highway Accident : ढाब्यावर जेवण करून परतताना कार-ट्रकचा भीषण अपघात; तीन मित्रांचा दुर्दैवी अंत, एकाची प्रकृती गंभीर

Pune Railway Station: "थोरले बाजीराव पेशवे पुणे स्टेशन… "; रेल्वे स्थानकावर झळकले बॅनर, राज्यात नवा वाद पेटला!

SCROLL FOR NEXT