Oppo K13 Mobile Launch Price Features Details esakal
विज्ञान-तंत्र

Oppo K13 : Oppoने लाँच केला सुपर मोबाईल! 7000mAh बॅटरीसह 80W फास्ट चार्जिंग; ब्रँड कॅमेरा अन् जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

Oppo K13 Mobile Launch Price Features Details : ओपो कंपनीने Oppo K13 हा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. यामध्ये 7000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगची सुविधा आहे.

Saisimran Ghashi

स्मार्टफोन बाजारात नवनवीन स्पर्धा निर्माण होत असताना ओप्पोने पुन्हा एकदा आपला वेगळेपणा सिद्ध केला आहे. ओप्पोने Oppo K13 5G हा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला असून त्याच्या दमदार फीचर्समुळे तो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अवघ्या १७,९९९ रुपये पासून सुरू होणाऱ्या किमतीत मिळणाऱ्या या फोनमध्ये 7000mAh क्षमतेची बॅटरी, 80W फास्ट चार्जिंग, 8GB रॅम, आणि Snapdragon 6 Gen 4 प्रोसेसर सारख्या जबरदस्त फीचर्सचा समावेश आहे.

डिझाईन आणि डिस्प्ले

Oppo K13 मध्ये 6.7 इंचांचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले दिला असून, त्याचा 120Hz रिफ्रेश रेट आणि 1200 निट्स ब्राइटनेस यामुळे वापरकर्त्यांना अतिशय स्मूथ आणि ब्राइट अनुभव मिळतो. 92.2% स्क्रीन-टू-बॉडी रेशो असलेल्या या डिस्प्लेला ओले हात किंवा ग्लोव्ह्ज घातल्यावरही टच रेस्पॉन्स मिळतो ही एक खासियत आहे.

दमदार परफॉर्मन्स

या स्मार्टफोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 6 Gen 4 प्रोसेसर असून त्यासोबत Adreno GPU व LPDDR4X 8GB रॅम दिली आहे. वापरकर्त्यांना 128GB आणि 256GB या दोन स्टोरेज पर्यायात फोन उपलब्ध आहे.

प्रो-कॅमेरा अनुभव

फोटोग्राफी प्रेमींसाठी Oppo K13 मध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा (OV50D40 सेन्सर) आणि 2MP सेकंडरी कॅमेरा असून हे ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप AI च्या सहाय्याने आणखी सक्षम बनले आहे. यात AI Clarity Enhancer, AI Eraser 2.0, AI Unblur, आणि Reflection Remover सारख्या फीचर्सचा समावेश आहे. सेल्फीसाठी 16MP Sony सेन्सर दिला असून त्यातून अत्यंत स्पष्ट आणि सुंदर सेल्फी मिळते.

बॅटरी आणि चार्जिंग

या फोनची सर्वात मोठी आकर्षणाची बाब म्हणजे 7000mAh क्षमतेची जबरदस्त बॅटरी. ती 80W SUPERVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीच्या मते, फक्त 30 मिनिटांत 62% चार्जिंग आणि 56 मिनिटांत फुल चार्ज होते. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर वापरकर्त्यांना 49.4 तास कॉल टाइम आणि 32.7 तास म्युझिक प्लेबॅकचा अनुभव मिळतो.

गेमिंग आणि थर्मल मॅनेजमेंट

गेमर्ससाठी देखील हा फोन फायदेशीर ठरतो. यात Snapdragon Elite Gaming, AI Trinity Engine, आणि AI LinkBoost 2.0 यांचा समावेश आहे. फोनमध्ये डेडिकेटेड Wi-Fi अँटेना असून नेटवर्क सिग्नलची गुणवत्ता वाढवण्याचे काम करते. या व्यतिरिक्त ग्राफाइट शीट आणि व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टम दिले गेले आहे, जे दीर्घकाळ गेमिंग करताना फोन गरम होऊ देत नाही.

अन्य फीचर्स

  • ऑपरेटिंग सिस्टम: Android 15 वरील ColorOS 15

  • सुरक्षा: इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर

  • धूळ आणि पाण्यापासून संरक्षण: IP65 रेटिंग

  • स्पीकर: ड्युअल स्टीरिओ स्पीकर

  • रिमोट कंट्रोल: इनबिल्ट IR ब्लास्टर

भारतातील किंमत आणि उपलब्धता

Oppo K13 5G चा 8GB + 128GB व्हेरियंट १७,९९९ रुपयेमध्ये तर 8GB + 256GB व्हेरियंट १९,९९९ रुपयेमध्ये मिळेल. Icy Purple आणि Prism Black या दोन आकर्षक रंगांमध्ये हा स्मार्टफोन २५ एप्रिलपासून Oppo India च्या वेबसाईटवर आणि Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
२० हजारच्या आत असा दमदार बॅटरी, बेस्ट प्रोसेसर, उत्तम कॅमेरा आणि गेमिंगसाठी उपयुक्त फीचर्स असलेला स्मार्टफोन शोधत असाल, तर Oppo K13 5G हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

London Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान दुर्घटनेची आता लंडनमध्ये पुनरावृत्ती

Wimbledon 2025 Final: यानिक सिनरने वचपा काढला,अल्काराजला हरवत जिंकलं विम्बल्डनचं विजेतेपद

ENG vs IND: भारतासमोर सोप्पं लक्ष्य, पण इंग्लंडनेही कसली कंबर; 3rd Test जिंकण्यासाठी शेवटच्या दिवसाचं कसं समीकरण?

शाळा ५ किमी अंतरावर असेल तर विद्यार्थ्याला ६००० रुपये मिळणार, सरकारची मोठी घोषणा, योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

Mumbai News: रेल्वेतच महिलेला प्रसुतीकळा, खाकी वर्दीतल्या देवदूताची धाव; माय लेकाचा वाचवला जीव

SCROLL FOR NEXT