Oppo Find N3 Flip esakal
विज्ञान-तंत्र

Oppo Find N3 Flip : ओप्पोचा फोल्डेबल फोन उद्यापासून खरेदीसाठी उपलब्ध; जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स

ओप्पोच्या या फोल्डेबल फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 चा नवा प्रोसेसर देण्यात आला आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Oppo Find N3 Flip : फोल्डेबल फोनची क्रेझ तरूणाईमध्ये मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे. या फोल्डेबल फोनची आवड असणाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे. अनेक मोबाईल कंपन्यांनी त्यांचे फोल्डेबल फोन मार्केटमध्ये आणले आहेत. आज मोबाईलच्या दुनियेतील आणखी एका मोठ्या कंपनीने त्यांचा फोल्डेबल फोन लॉंच केला आहे. या कंपनीचे नाव आहे ओप्पो.

ओप्पो कंपनीच्या या फोल्डेबल फोनचे नाव Oppo Find N3 Flip असे आहे. या फोनचा मुख्य डिस्प्ले हा 7.82 इंच असून याची बाहेरील स्क्रिन ही 6.3 अशी असणार आहे.

विशेष म्हणजे हा फोन Android 13 OS वर चालतो. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2  ही चिपसेट देण्यात आली आहे. या फोल्डेबल फोनची किंमत तब्बल १,१३,८०० इतकी आहे.

Oppo Find N3 Flip मध्ये स्पेसिफिकेशन्स काय आहेत ?

ओप्पोच्या या फोल्डेबल फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 चा नवा प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर 16GB रॅम आणि 512 GB स्टोरेजसह जोडण्यात आलेला आहे. या फोनची मुख्य स्क्रिन 7.82 इंचाची असून ती 2K रिझोल्यूशनची आहे.

या फोनच्या स्क्रिनच्या संरक्षणासाठी अल्ट्रा लेअरची थीन ग्लास देण्यात आली आहे. फोल्डेबल फोनच्या डिस्प्लेबद्दल बोलायचे झाल्यास या फोनचा डिस्प्ले 6.31 इंच असून तो FHD+ आहे. याच्या रिझोल्यूशनबद्दल बोलायचे झाल्यास ते 1116x2484 पिक्सेल्स इतके आहे.

Oppo Find N3 Flip चा कॅमेरा कसा ?

या फोल्डेबल फोनच्या कॅमऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास यातला कॅमेरा तगडा आहे. या फोल्डेबल फोनचा कॅमेरा ४८ मेगापिक्सेल्सचा असून यातील अल्ट्रावाईड अँगल लेन्स देखील ४८ मेगापिक्सेल्स असणार आहे.

विशेष म्हणजे या फोल्डेबल फोनमध्ये तब्बल 64 मेगापिक्सेल्सचा टेलिफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या मोबाईलमध्ये 32 मेगापिक्सेल्सचा सेल्फी शूटर कॅमेरा देण्यात आला आहे.

Oppo Find N3 Flip मोबाईलवरील डिस्काऊंट

ओप्पोचा हा फोल्डेबल फोन उद्यापासून (22 ऑक्टोबरपासून) खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. या फोनवर तुम्हाला 8000 रूपयांचा डिस्काऊंट मिळणार असून ६ महिन्यांची स्क्रिन वॉरंटी देखील मिळणार आहे.

या फोल्डेबल फोनवर तुम्हाला १२००० रूपयांचा कॅशबॅक आणि SBI बॅंक आणि ICICI बॅंक कार्डवर २४ महिन्यांचा नो कॉस्ट EMI देखील मिळणार आहे. हा फोन तुम्हाला फिल्पकार्ट आणि ओप्पोच्या वेबसाईटवरून ऑनलाईन खरेदी करता येईल. तसेच, प्रमुख रिटेलर्सकडे हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT