Oppo Reno 14 Series Price Features esakal
विज्ञान-तंत्र

Oppo Reno 14 Launch : एकच झलक, सबसे अलग! लाँच झाली Oppo Reno 14 सिरीज; 50MP कॅमेरे, 1TB स्टोरेजसह AI फिचर्स अन् किंमत फक्त..

Oppo Reno 14 Series Price Features : ओपोने Reno 14 आणि Reno 14 Pro स्मार्टफोन्स भारतात लाँच केले आहेत.

Saisimran Ghashi
  • ओप्पो Reno 14 सिरीजमध्ये AI-आधारित 50MP कॅमेऱ्यांचा समावेश आहे.

  • हे फोन Android 15 आणि ColorOS 15 वर चालतात, 1TB स्टोरेजसह.

  • Reno 14 Pro मध्ये मोठी बॅटरी, वायरलेस चार्जिंग व प्रीमियम डिझाईन दिले आहे.

Oppo Reno 14 Price : स्मार्टफोन बाजारात नवनवीन तंत्रज्ञानाची चढाओढ सुरू असतानाच Oppo ने आपली बहुप्रतीक्षित Reno 14 आणि Reno 14 Pro सिरीज भारतात अधिकृतपणे लाँच केली आहे. प्रीमियम लुक, AI कॅमेरा क्षमतांसह आणि जबरदस्त स्टोरेज व बॅटरी फीचर्सने युक्त असलेल्या या स्मार्टफोन्सनी मिड प्रीमियम सेगमेंटमध्ये चांगलीच चर्चा निर्माण केली आहे.

किंमत आणि उपलब्धता

  • Reno 14 (8GB + 256GB) – 37,999 रुपये

  • Reno 14 (12GB + 256GB) – 39,999 रुपये

  • Reno 14 Pro (12GB + 256GB) – 49,999 रुपये

  • Reno 14 Pro (12GB + 512GB) – 54,999 रुपये

जुलै ८ पासून Amazon, Vijay Sales आणि प्रमुख ऑफलाइन स्टोअर्सवर विक्री सुरू होणार आहे.

डिझाईन आणि डिस्प्लेची लकाकी

  • Reno 14 आणि Reno 14 Pro दोन्ही स्मार्टफोनमध्ये मेटल फ्रेम आणि Oppo च्या Iridescent Glow Process वापरून बनवलेले ग्लास बॅक पॅनल आहे.

  • Reno 14 रंग पर्याय – Mermaid, Pinellia Green, Reef Black

  • Reno 14 Pro रंग पर्याय – Calla Lily Purple, Mermaid, Reef Black

डिस्प्ले

  • Reno 14 – 6.59 इंच OLED, 1.5K रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट

  • Reno 14 Pro – 6.83 इंच OLED, Crystal Shield Glass प्रोटेक्शनसह

परफॉर्मन्स आणि सॉफ्टवेअर

  • Reno 14 मध्ये MediaTek Dimensity 8350 चिप

  • Reno 14 Pro मध्ये नवीन MediaTek Dimensity 8450 प्रोसेसर

  • RAM व स्टोरेज – 16GB LPDDR5X पर्यंत RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेज

  • OS – Android 15 आधारित ColorOS 15

  • AI कॅमेरा

Reno 14 Pro

  • 50MP मुख्य कॅमेरा (OV50E sensor, OIS सह)

  • 50MP पेरिस्कोप टेलीफोटो (3.5x झूम)

  • 50MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा

  • 50MP डेप्थ/पोर्ट्रेट कॅमेरा

Reno 14

  • 50MP Sony IMX882 मुख्य सेन्सर

  • 8MP अल्ट्रावाइड

  • 50MP टेलीफोटो कॅमेरा

दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 50MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी आणि चार्जिंग

  • Reno 14 Pro मध्ये दमदार 6200mAh बॅटरी

  • वायरलेस चार्जिंग सपोर्टसह जलद चार्जिंग सुविधा

  • स्मार्टफोन्समध्ये AI बॅटरी हेल्थ मॅनेजमेंट सुद्धा दिलं आहे.

FAQs

  1. Oppo Reno 14 सिरीजची किंमत किती आहे?
    37,999 रुपयांपासून सुरू होऊन 54,999 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.

  2. Reno 14 आणि Reno 14 Pro मध्ये काय फरक आहे?
    Pro मॉडेलमध्ये अधिक शक्तिशाली चिप, क्वाड 50MP कॅमेरा आणि मोठी बॅटरी आहे.

  3. या फोनमध्ये सेल्फी कॅमेरा किती MP चा आहे?
    दोन्ही फोनमध्ये 50MP सेल्फी कॅमेरा दिला आहे.

  4. फोनमध्ये कोणती Android आवृत्ती आहे?
    Android 15 आधारित ColorOS 15 यामध्ये दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT