Chandrayaan-3 Rocket Part eSakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan-3 Update : पृथ्वीच्या वातावरणात परतला चांद्रयान-3 मधील एक भाग, इस्रोने दिली माहिती

Chandrayaan-3 Launcher Part : बुधवारी दुपारी दोन वाजून 42 मिनिटांनी रॉकेटचा हा भाग पृथ्वीच्या वातावरणात आला.

Sudesh

Chandrayaan-3 Rocket Part : चांद्रयान-3 बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. या यानाला पृथ्वीबाहेर पोहोचवणाऱ्या LVM3 M4 या रॉकेटचा एक भाग आता पृथ्वीच्या वातावरणात परत आला आहे. भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने याबाबत माहिती दिली आहे.

इस्रोने सांगितलं, की संभाव्य इम्पॅक्ट पॉइंट हा पॅसिफिक महासागराच्या वर असू शकतो. अंतिम ग्राउंड ट्रॅक हा भारतावरुन गेला नसल्याचंही इस्रोने स्पष्ट केलं. आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेनुसार, बुधवारी दुपारी दोन वाजून 42 मिनिटांनी रॉकेटचा हा भाग पृथ्वीच्या वातावरणात आला.

हा भाग म्हणजे एलव्हीएम 3 रॉकेटचा क्रायोजेनिक वरचा भाग असल्याचं इस्रोने सांगितलं आहे. लाँच झाल्यानंतर सुमारे 124 दिवसांमध्ये हा भाग पृथ्वीच्या कक्षेत परत आला असल्याचं सांगण्यात येत आहे. (Science News)

भारताने रचला इतिहास

14 जुलै 2023 रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून चांद्रयान-3 चे प्रक्षेपण करण्यात आले होते. 23 ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करून भारताने नवा इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारा भारत पहिलाच देश ठरला. यानंतर चांद्रयान-3 ने पुढील 14 दिवस अपेक्षित डेटा गोळा करून ही मोहीम फत्ते केली होती.

प्रज्ञान-विक्रम चिरनिद्रेत

चांद्रयान-3 मधील प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर हे चंद्रावर चिरनिद्रा घेत आहेत. मोहीम पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्लीप मोडवर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर चंद्रावर रात्र सुरू झाल्यामुळे हे दोन्ही डिव्हाईस फ्रीज झाले. पुन्हा सूर्योदय झाल्यानंतर लँडर-रोव्हरला सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, याला अपयश मिळालं. यानंतर हे मिशन पूर्णपणे संपल्याची घोषणा करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT