Paytm Founder Vijay Shekhar Sharma Whatsapp Chat Fraud Incident esakal
विज्ञान-तंत्र

Paytm Vijay Sharma : शेर पे सवाशेर! PAYtm संस्थापकांना त्यांच्याचं नावानं फसवल्याची घटना; पुढे जे झालं वाचून आश्चर्यचकित व्हाल

Paytm Founder Vijay Shekhar Sharma Whatsapp Chat Fraud Incident : पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांच्याच नावाने फसवणूक करण्याचा प्रयत्न उघड झाला आहे. व्हॉट्सॲप चॅटमधून फसवणुकीचे धक्कादायक आणि हास्यास्पद पैलू समोर आले.

Saisimran Ghashi

Paytm Founder Vijay Shekhar Scam : डिजिटल व्यवहार आणि आर्थिक तंत्रज्ञानाच्या दुनियेत अग्रगण्य असलेल्या पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांच्यासोबत अलीकडेच एका विचित्र आणि मजेशीर घटना झाली आहे. विशेष म्हणजे कोणीतरी त्यांच्या नावाचा वापर करत त्यांनाच फसवायचा प्रयत्न केला

शर्मा यांनी स्वतः X (पूर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर हा अनुभव शेअर केला आणि एक महत्त्वाचा सायबर धोका समोर आणला. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते. "Impersonating Myself to Me" म्हणजेच "माझचं रूप घेऊन मलाच फसवण्याचा प्रयत्न".

काय घडलं नेमकं?

एका WhatsApp चॅटमध्ये एक फसवणूक करणारा व्यक्ती विजय शेखर शर्मा असल्याचं भासवत होता. त्याने "नवीन नंबर" सेव्ह करण्याची विनंती केली आणि त्यानंतर कंपनीतील आर्थिक स्थितीबद्दल माहिती विचारली. इतकंच नव्हे तर कंपनीच्या फायनान्स हेडचे संपर्क तपशील मागितले आणि एक .exe फाईल जी ‘GST डॉक्युमेंट’ म्हणून पाठवली होती ती पुढे पाठवण्यास सांगितले.

विजय शेखर शर्मा यांनी या फसवणुकीला विनोदी शैलीत हाताळलं. त्यांनी फसवणूक करणाऱ्याला "तुम्ही चांगलं काम करता, पगारवाढ घेण्याचा विचार करा!" असं लिहून थट्टा केली.

हा प्रसंग हास्याचा विषय असला, तरी यामागे एक गंभीर सत्य आहे सायबर फसवणूक आता केवळ सामान्य नागरिकांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर मोठ्या कंपन्यांचे प्रमुख सुद्धा तिचे लक्ष्य ठरत आहेत.

FRI यंत्रणा

या घटनांमुळे सायबर सुरक्षेच्या गरजेवर पुन्हा एकदा लक्ष केंद्रीत झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, दूरसंचार विभागाने (DoT) 'Financial Fraud Risk Indicator (FRI)' या नव्या यंत्रणेची नुकतीच घोषणा केली आहे.

ही यंत्रणा बँका, UPI सेवा प्रदाते आणि इतर वित्तीय संस्थांना संशयित मोबाइल क्रमांक ओळखण्याची आणि व्यवहार थांबवण्याची ताकद देते. FRI हे 'Digital Intelligence Platform' (DIP) चा भाग असून त्याद्वारे बँकांना फसवणुकीची शक्यता असलेल्या क्रमांकांविषयी त्वरित माहिती मिळते.

Airtel कडूनही सुरक्षेसाठी पाऊल

याच दरम्यान, Airtel ने सुद्धा 'fraud detection solution' सुरू केलं आहे. जे WhatsApp, Telegram, Facebook, Instagram, आणि ईमेलसारख्या प्लॅटफॉर्मवरून होणाऱ्या सायबर फसवणूक करणाऱ्या लिंकना (malicious links) थांबवण्याचे काम करते. सध्या ही सेवा हरियाणा सर्कलमध्ये सुरू असून लवकरच देशभर लागू होणार आहे.

विजय शेखर शर्मा यांचा अनुभव आपल्याला हसवतो, पण एक गोष्ट ठळकपणे समोर आणतो सायबर जागरूकता ही काळाची गरज बनली आहे. कोणतीही लिंक उघडण्याआधी किंवा अपरिचित नंबरवरून आलेल्या मेसेजवर विश्वास ठेवण्याआधी काळजी घ्या... नाहीतर फसवणुकीच्या जाळ्यात सापडायला वेळ लागणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025 India Squad: वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! १५ जणींच्या संघात कोणाला मिळाली संधी?

Mumbai Rain Alert: घाटकोपर-अंधेरी लिंक रोड बंद; साकीनाका परिसरात पाणीच पाणी

'हम आपके हैं कौन' साठी कुणाला किती मिळालेलं मानधन? माधुरीला सगळ्यात जास्त तर रीमा लागूंना मिळालेले फक्त...

Mumbai-Pune Latest Rain Live Updates Maharashtra :मुखमेडमध्ये मुसळधार पाऊस, हसनळ गाव पाण्याखाली

Asia Cup 2025 India Squad: श्रेयस अय्यरची चूक काय? त्याच्यासह यशस्वी अन् ६ खेळाडूंची संधी हुकली; अजित आगरकर म्हणतो...

SCROLL FOR NEXT