paytm
paytm 
विज्ञान-तंत्र

पेटीएमची नवीन सुविधा क्रेडिट कार्डचे बिल भरणाऱ्यांसाठी फायदेशीर; जाणून घ्या नवीन बदल

सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: सध्या आपण पेटीएमचा वापर किराणा दुकानातून वस्तू खरेदी करण्यासाठी, पाणी व विजेची बिले भरण्यासाठी करतो. तसेच गॅस सिलेंडर्स बुक करण्यासाठी, मोबाईल व डीटीएच रिचार्ज करण्यासाठी किंवा ऑनलाइन ऑर्डरसाठी पेटीएम वापरता येते. मागील काही काळात पेटीएम देशभरातील सर्वात मोठा डिजिटल पेमेंट पर्याय म्हणून उदयास आला आहे. कंपनी सतत आपल्या अ‍ॅपमध्ये नवीन फिचर आणत राहिली आहे. विशेष म्हणजे आता पेटीएममध्ये क्रेडिट कार्ड बिल फेच करण्याचा पर्यायही आला आहे.

SMS वाचण्याची परवानगी आवश्यक-
आता तुमचे बिल स्वयंचलितपणे अॅपवर दिसून येईल. यासाठी तुम्हाला मोबाइलवरचे मेसेज (एसएमएस) वाचण्याची परवानगी द्यावी लागेल.

पेटीएम अ‍ॅपवर क्रेडिट कार्ड बिलाचे पेमेंट असं करा-
1. प्रथम पेटीएम अपडेट करा.
२. त्यानंतर पेटीएम अ‍ॅप उघडा आणि All Service वर क्लिक करा.
3. यानंतर Monthly Bills वर क्लिक केल्यावर तुम्हाला Credit Card Bill क्रेडिट कार्ड बिलाचा पर्याय दिसेल.4. जर तुम्ही प्रथमच कार्ड पेमेंट करत असाल तर Pay Bill For New Credit Card क्लिक करा. यानंतर, कार्ड क्रमांक प्रविष्ट करा आणि Proceed वर क्लिक करा.
5. आता पेमेंट मोड निवडा. यानंतर, यूपीआय, डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंगद्वारे पेमेंट कर.

CRED ला टक्कर-
सध्या बाजारात CRED, पेटीएम, मोबिकविक, फोनपे, Amazon PaY द्वारे आपण आपले क्रेडिट कार्ड बिल वापरू शकता. यामध्ये क्रेडिट कार्डचं बील भरण्यासाठी यापुर्वी CRED ला उत्तम मानलं जात होतं. आता पेटीएमच्या या सुविधेनंतर CRED ला टक्कर मिळणार आहे.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : सीएसकेची संथ सुरूवात; भुवनेश्वरनं दिला पहिला धक्का

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT