Flipkart Sakal
विज्ञान-तंत्र

Online Shopping: फ्लिपकार्टला दणका! वेळेवर डिलिव्हरी न केल्याने ठोठावला ४२ हजारांचा दंड

एका महिलेला वेळेत फोनची डिलिव्हरी न करणे फ्लिपकार्टला महागात पडले आहे. या प्रकरणात ग्राहक न्यायालयाने फ्लिपकार्टला दंड ठोठावला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Online Shopping: गेल्याकाही वर्षात Online Shopping चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र, ऑनलाइन शॉपिंग करताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. अनेकदा ग्राहकांना चुकीची वस्तू देखील डिलिव्हर होते. तर काहीवेळा वस्तू ऑर्डर केल्यानंतर देखील मिळत नाही. परंतु, आता ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टला असे करणे महागात पडले आहे.

बंगळुरू येथील महिलेने फ्लिपकार्टवरून १२,४९९ रुपये किंमतीचा मोबाइल ऑर्डर केला होता. परंतु, महिलेला फोन मिळाला नाही. या प्रकरणात आता फ्लिपकार्टला महिलेला भरपाई द्यावी लागणार आहे.

कस्टमर केअरकडून मिळाली नाही मदत

महिलेने ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून फोन ऑर्डर केला होता. परंतु, महिलेला या फोनची डिलिव्हरी मिळाली नाही. महिलेने याबाबत फ्लिपकार्ट कस्टमर केअरशी संपर्क देखील साधला. मात्र, कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. फोनची डिलिव्हरी न मिळाल्यामुळे अखेर महिलेने कंपनीविरोधात तक्रार दाखल केली.

याप्रकरणात आता ग्राहक न्यायालयाने महिलेचे बाजूने निकाल देत कंपनीला दंड ठोठावला आहे. कंपनी महिलेला मोबाइलची किंमत १२,४९९ रुपये परत करेल. तसेच, यावरील वार्षिक १२ टक्के व्याज देखील देण्यास सांगण्यात आले आहे. कंपनीने २० हजार रुपये दंड आणि १० हजार रुपये कायदेशीर खर्च महिलेला द्यावा, असे न्यायालयाने म्हटले आहे.

हेही वाचा: Flying Bike: आता हवेतही होणार धूम धूम, फ्लाइंग बाईकचे बुकिंग सुरू; किंमत तब्बल...

बंगळुरू येथील ग्राहक न्यायालयाने म्हटले की, फ्लिपकार्टने सर्व्हिसच्याबाबतीत निष्काळजीपणा दाखवला आहे. फोनची वेळेवर डिलिव्हरी न झाल्याने ग्राहकांचे आर्थिक नुकसान तर झालेच, सोबतच मानसिक त्रास देखील सहन करावा लागेल.

निकालात म्हटले आहे की, फोन मिळाला नसतानाही महिला इंस्टॉलमेंट देत होती. कस्टम केअरशी संपर्क साधल्यानंतर देखील कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अशाप्रकारची प्रकरणं याआधी देखील समोर आली आहेत. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंग करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा: ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT