Pieter Levels' New Website Shows Airlines' Lost Luggage Rankings esakal
विज्ञान-तंत्र

Luggage Loss : गर्लफ्रेंडचं साहित्य एअरपोर्टवरून हरवलं! पठ्ठ्याने विमान कंपन्यांना धडा शिकवण्यासाठी काय केलं? जाणून घ्याच

Airport Problem : कोट्यवधीधींचे मालक पीटर लेव्हल्स यांनी नुकतीच विमान प्रवाश्यांचे सर्वाधिक सामान गमावणार्‍या विमान कंपन्यांची रँकिंग करणारी वेबसाइट बनवली आहे.

Saisimran Ghashi

Ranking Website : कोट्यवधीधींचे मालक असलेले पीटर लेव्हल्स यांनी नुकतीच विमान प्रवाश्यांचे सर्वाधिक सामान गमावणार्‍या विमान कंपन्यांची रँकिंग करणारी वेबसाइट बनवली आहे. या रँकिंगमध्ये भारताच्या तब्बल तीन विमान कंपन्या टॉप १२ मध्ये समाविष्ट झाल्या आहेत.

हॅकॅथॉन आयोजित करणारे आणि NomadList सर्व्हिसचे निर्माते असलेले पीटर लेव्हल्स यांनी ही वेबसाइट बनवली आहे. ही रँकिंग इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या गमावलेल्या सामान डेटावर आणि जगभरातील १०० पेक्षा जास्त भाषांमध्ये लोकांनी केलेल्या ऑनलाईन तक्रारींवर आधारित आहे.

या रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवणारी कंपनी म्हणजे टाटा समूहाची एअर इंडिया आहे. एअर इंडिया बरोबरच या यादीत आय़ऺर लिंगस, वेस्ट जेट एअरलाइन्स, ब्रिटिश एअरवेज, आयबेरिया, स्पाइसजेट आणि इतर विमान कंपन्यांचा समावेश आहे. यामध्ये स्पाइसजेट सहाव्या तर इंडिगो बाराव्या क्रमांकावर आहे.

या वेबसाइटवर विमान कंपन्यांच्या आकारमानाचा आणि त्यांच्या विमान आणि कर्मचाऱ्यांच्या संख्येचाही विचार केला जातो. सर्व प्रमुख विमान कंपन्यांची 24/7 माहिती या वेबसाइटवर पाहायला मिळते.

पीटर लेव्हल्स यांनी या वेबसाइट बद्दल सांगताना म्हटले आहे, "ही एक लाईव्ह रँकिंग आहे जिथे विमान कंपन्या सामान गमावण्याच्या बाबतीत कितव्या स्थानावर आहेत हे दाखवले जाते. यामुळे तुम्ही या कंपन्यांच्या विमानाने प्रवास करणे टाळू शकता आणि त्यांना सुधारणा करण्यासाठी प्रेरणा मिळू शकेल."

या वेबसाइट निर्मितीमागील कारण सांगताना लेव्हल्स म्हणाले, "व्ह्युएलिंग या विमान कंपनीने दोन आठवड्यांपूर्वी माझ्या गर्लफ्रेंडची बॅग गमावली आणि अजूनही ती परत केली गेली नाही. अशी एखादी वेबसाइट असती तर मी व्ह्युएलिंगची विमाने कधीच बुक केली नसती कारण ते सामान गमावण्याच्या बाबतीत आठव्या क्रमांकावर आहेत. तुम्हाला ही वेबसाइट आवडेल आणि तुम्हीही अशाच त्रासापासून वाचाल अशी अपेक्षा आहे."

या यादीत सर्वाधिक सामान गमावणारी कंपनी एअर इंडिया असली तरी, जपानची ऑल निप्पॉन एअरवेज सामान गमावण्याच्या बाबतीत सर्वात कमी क्रमांकावर आहे. लॅटॅम ब्राझील आणि अलास्का एअरलाइन्स अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

विमान कंपन्या गमावलेल्या सामानचा डेटा नियमित प्रकाशित करीत नाहीत, त्यामुळे ही वेबसाइट माहिती गोळा करण्यासाठी मुख्यत्वे सोशल मीडियावर अवलंबून आहे. त्यामुळे या रँकिंगवर पूर्णपणे विश्वास न ठेवता थोडक्याशा साशंक नजरेने त्याकडे पाहणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

Magnesium & Vitamin D Deficiency: व्हिटॅमिन-D ची पातळी कमी होण्यामागे असू शकतो 'या' खनिजांचा अभाव, 'हे' अन्नपदार्थ ठरतील उपयुक्त

SCROLL FOR NEXT