Pixel Watch 2 eSakal
विज्ञान-तंत्र

Pixel Watch 2 : गुगलची नवीन 'पिक्सेल वॉच 2' लाँच, मिळणार नवीन एआय फीचर्स, किती आहे किंमत?

Made by Google : या स्मार्टवॉचमध्ये कित्येक नवीन एआय फीचर्स देण्यात आले आहेत.

Sudesh

'मेड बाय गुगल' हा गुगलचा वार्षिक इव्हेंट सध्या पार पडत आहे. यामध्ये गुगलने आपली नवीन, अपग्रेडेड 'पिक्सेल वॉच 2' ही स्मार्टवॉच लाँच केली. या स्मार्टवॉचमध्ये कित्येक नवीन एआय फीचर्स देण्यात आले आहेत. दैनंदिन वापरासाठी आणि एक फिटबिट म्हणून ही सगळ्यात बेस्ट स्मार्टवॉच असल्याचं गुगलने म्हटलं आहे.

नवीन पिक्सेल वॉचमध्ये गुगलने 31 बँड ऑप्शन्स दिले आहेत. नवीन स्मार्टवॉचचे बँड्स देखील पिक्सेल वॉच 1 प्रमाणेच आहेत. त्यामुळे यूजर्स आपले जुने बँड्स देखील नवीन पिक्सेल वॉचला वापरू शकणार आहेत.

या वॉचमध्ये नवीन एआय फीचर्स, नवीन वॉच फेसेस आणि नवीन हार्डवेअर देण्यात आलं आहे. पिक्सेल वॉच 2 चा बॅटरी बॅकअप देखील वाढवण्यात आला आहे. वॉच फेस ऑन ठेवल्यानंतर देखील ही स्मार्टवॉच 24 तासांचा बॅटरी बॅकअप देणार आहे.

गुगलच्या पिक्सेल वॉच 2 साठी प्री-बुकिंग सुरू करण्यात आलं आहे. 12 ऑक्टोबरपासून याचं शिपिंग सुरू होईल. Pixel Watch 2 च्या GPS व्हर्जनची किंमत 349 डॉलर्स एवढी असणार आहे. तर, LTE व्हर्जनची किंमत 399 डॉलर्स एवढी असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagdeep Dhankhar Health Update: माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड रूग्णालयात दाखल!, ‘वॉशरूम’मध्ये पडले होते दोनदा बेशुद्ध

Pune News : सिमेंट मिक्सर चालकाचा निष्काळजीपणा नडला; पाषाण-बाणेर लिंक रोडवरील दुर्घटनेत २५ वर्षीय तरुणाचा अंत!

Maharashtra Health Campaign : राज्याच्या आरोग्य विभागाचा मोठा निर्णय; ३१ मार्चपर्यंत राबविणार ९ विशेष आरोग्य मोहिमा!

PMC Elections : "आमचं आयुष्य आता होईल सुकर!" नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सिंहगड रस्तावासियांच्या अपेक्षा उंचावल्या

Latest Marathi News Live Update : सटाण्यात अनैतिक मानवी व्यापाराचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT