pm kisan kyc esakal
विज्ञान-तंत्र

PM Kisan Yojna : 'ई-केवायसी' अनिवार्य, पण शेतकऱ्यांसमोर भलत्याच अडचणी; अशी करा eKYC

PM Kisan Yojna : दहाव्या हप्त्यानंतर आता 11 व्या हप्त्याचे वेध लागले आहेत. परंतु लाभार्थी शेतकऱ्यांसमोर एक वेगळी समस्या निर्माण झाली आहे.

सुरज सकुंडे

PM Kisan Sanman Yojna: पीएम किसान सन्मान योजना अत्यंत महत्त्वाची योजना आहे. देशभरातील अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आहे. या योजनेचा दहावा हप्ता जानेवारीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता. दहाव्या हप्त्यानंतर आता 11 व्या हप्त्याचे वेध लागले आहेत. परंतु लाभार्थी शेतकऱ्यांसमोर (Farmer) एक वेगळी समस्या निर्माण झाली आहे. सरकारने या योजनेमध्ये नियम व अटींमध्ये बदल केले आहेत. त्याचप्रकारे 'ई-केवायसी' सुद्धा करून घ्यावी लागणार आहे. परंतु गावाखेड्यामध्ये हे करायला अडचण होणार आहे. अनेक ठिकाणी ई-केवायसीसाठी आवश्यक बायोमेट्रीक बंद आहेत. त्यामुळे उरलेल्या 20 दिवसात जर शेतकरी ई केवायसी पूर्ण करू शकले नाहीत, तर त्यांना अकरावा हप्ता मिळणार नाही. (PM Kisan Yojna: 'E-KYC' is mandatory, but farmers face difficulties)

ई केवायसीसाठी स्थानिक पातळीवर शेतकरी सीएससी केंद्रावर अवलंबून असतात मात्र त्यासाठी आवश्यक असलेले बायोमेट्रिकही बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. जर ई-केवायसी केले नाही तर 11 वा हप्ता जमा होणार नाही. शिवाय शेतकऱ्यांकडे केवळ 20 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे.

31 मार्चनंतर PM KiSAN चा 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी हे गावस्तरावर जाऊन सर्व्हे करणार आहे. केवायसीसाठीही 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना आगामी 20 दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ‘ई-केवायसी’ हे ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष सीएससी केंद्रावर जाऊन करावे लागणार आहे. परंतु या सेंटरवर शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागत आहे. ई-केवीसी ची प्रकिया सुरु असतानाच अचानक वेबसाईट अचानक बंद होत असल्यामुळे शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण होत नाहीये.

अशी करा eKYC -

तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही ऑनलाईन केवायसी करू शकता अन्यथा तुम्हाला केवायसी सीएससी सेंटरवर जाऊन करावी लागेल.

  • प्रथम www.pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.

  • पी. एम. किसान योजनेची अधिकृत वेबसाईट तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

  • आता तुम्हाला लाल अक्षरांमध्ये eKYC is mandatory for PMKISAN Registered farmers... अशी सूचना दिसेल.

  • तुमचं आधार आणि पॅनकार्ड लिंक असेल तर ई केवायसी करू शकता. तुम्ही दोन मार्गांनी केवायसी पूर्ण करू शकता.

  • आता फार्मर कॉर्नर वरती eKYC ला क्लिक करा.

  • आता एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. त्यामध्ये सुरुवातीला आधार कार्ड क्रमांक टाका.

  • त्यानंतर समोरच्या बॉक्समधील कॅप्चा कोड टाका.

  • आता search या पर्यायावर क्लिक करा.

  • आता नवीन पेजवर आधार नंबर तसेच त्यानंतर मोबाईल नंबर टाका.

  • Get Otp या पर्यायावर क्लिक करा.

  • तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP नंबर येईल तो OTP तेथे submit करा.

  • त्यानंतर submit for Auth यावर क्लिक करा.

  • आता तुम्हाला EKYC is successful submitted असा मॅसेज दिसेल. याचाच अर्थ ईकेवायसी पूर्ण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : हांडेवाडीमध्ये टायर साठ्याच्या शेडला भीषण आग

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

Sangli Girl : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर दमदाटीने दोघांचे शारिरीक संबंध, आणखी दोघांनी त्याच मुलीवर केला विनयभंग; पोलिस म्हणतात...

SCROLL FOR NEXT