PM Modi Chandrayaan-3  Sakal
विज्ञान-तंत्र

PM Modi On Chandrayaan-3 : लवकरच भारत चंद्रावर पाठवणार माणूस; खुद्द PM मोदींनी सांगितलं टार्गेट

रोहित कणसे

इस्त्रोने चांद्रय़ान-३ चे प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीरित्या स्थानांतरित करण्यात आलं आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हा भारताच्या भविष्यातील अंतराळातील प्रयत्नांसाठी हे मोठं यश असल्याचे म्हटले आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, इस्त्रोचे अभिनंदन, आपल्या भविष्यातील अंतराळ मोहिमांबाबत आपण एक मैलाचा दगड गाठला आहे. ज्यामध्ये २०४० पर्यंत एक भारतीय नागरिकाला चंद्रावर पाठवण्याच्या उद्देशाचा देखील समावेश आहे.

इस्त्रोने मंगळवारी या ऑपरेशनला एक अनोखा प्रयोग म्हटलं आहे. चांद्रयान-३ चा मुख्य उद्देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणे आणि विक्रम लँडर व प्रज्ञान रोव्हरवर लावण्यात आलेल्या उपकरणांच्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणे हा होता. हे अंतराळ यान १४ जुलै २०२३ रोजी श्रीहरीकोट्टा येथील सतीश धवन स्पेस सेंटरहून एलव्हीएम३-एम४ रॉकेटच्या मदतीने लाँच करण्यात आलं. चांद्रयान-३ ने २३ ऑगस्ट संध्याकाळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं होतं.E

इस्त्रोने सांगितले की प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून परत पृथ्वीच्या कक्षेत परत आणण्याच्या प्रयोगाच मुख्य फायदा आगामी मोहिमांची योजना तयार करण्यासाठी होईल. खासकरून चंद्रावरून मिशन पृथ्वीवर परत आणण्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. चांद्रयान -३ मिशनचे प्रोपल्शन मॉड्यूल १७ ऑगस्ट २०२३ रोजी विक्रम लँडरपासून वेगळा झाला होता आणि चंद्राच्या भोवती फिरत होता.

पहिल्या प्रोपल्शन मॉड्यूलचे आयुष्य ३ ते ६ महिने सांगितली जात आहे. मात्र इस्त्रोने दावा केला आहे की ते अनेक वर्षांपर्यंत काम करू शकते. कारण त्यामध्ये तेवढे इंधन शिल्लक आहे. जेव्हा चांद्रयान -३ चे लाँचिंग झाले होते तेव्हा पोपल्शन मॉड्यूल मध्ये १६९६.४ किग्रॅ फ्यूल होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: कारंजा लाड येथे २३.६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त,दोघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT