Poco C50 Sakal
विज्ञान-तंत्र

Poco Phone: अवघ्या ७ हजारात लाँच झाला पोकोचा शानदार स्मार्टफोन, फीचर्स खूपच अफलातून

स्मार्टफोन ब्रँड पोकोने आपला नवीन स्वस्त स्मार्टफोन Poco C50 ला लाँच केले आहे. या फोनची किंमत १० हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

सकाळ डिजिटल टीम

Poco C50 Smartphone Launched: स्मार्टफोन ब्रँड पोकोने आपला नवीन स्वस्त स्मार्टफोन Poco C50 ला लाँच केले आहे. या फोनची किंमत १० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. फोनमध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट, मीडियाटेक हीलियो ए२२ प्रोसेसर, ३ जीबीपर्यंत रॅम आणि ३२ जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल. फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल.

Poco C50 ची किंमत

POCO C50 स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. फोनच्या २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ६,६९९ रुपये, ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ७,२९९ रुपये आहे. लाँचिंग ऑफर अंतर्गत फोनच्या २ जीबी रॅम व्हेरिएंटला ६,२४९ रुपये आणि ३ जीबी रॅम व्हेरिएंटला ६,४९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. फोन रॉयल ब्लू आणि कंट्री ग्रीन रंगात येतो. १० जानेवारीपासून फ्लिपकार्टच्या माध्यमातून फोनची विक्री होईल.

हेही वाचा: Maruti Suzuki: नवीन कार खरेदी करायचीये? Maruti Baleno आहे एकदम परफेक्ट, फक्त ९९ हजारात घेऊन जा घरी

Poco C50 चे स्पेसिफिकेशन्स

POCO C50 मध्ये ६.५२ इंच एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला असून, याचे रिझॉल्यूशन ७२०x१६०० पिक्सल आणि १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळतो. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो ए२२ प्रोसेसरसह ३ जीबीपर्यंत रॅम आणि ३२ जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल. स्टोरेजला मायक्रो एशडी कार्डच्या मदतीने वाढवू शकता. फोन अँड्राइड १२ गो एडिशनवर काम करतो.

पोकोच्या या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्यूल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात ८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेऱ्यासह सेकेंडरी कॅमेरा मिळेल. तर सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

कॅमेऱ्याद्वारे १०८० पिक्सल ३०fps पर्यंत व्हीडिओ रेकॉर्ड करू शकता. फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी १० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय, कनेक्टिव्हिटीसाठी 4G, वाय-फाय, ब्लूटूथ आणि सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेंसरचा सपोर्ट मिळेल.

हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT