Poco C71 Review sakal
विज्ञान-तंत्र

Poco C71: आहे तरी कसा? 5,200mAh बॅटरी, 15W फास्ट चार्जिंग अन् जबरदस्त फीचर्स... वाचा रिव्ह्यू

Poco C71 Review: 5,200mAh बॅटरी, 15W फास्ट चार्जिंग आणि जबरदस्त फीचर्ससह, या मोबाईलची झलक पहा!

Anushka Tapshalkar

Poco C71 Review: दररोज आपल्याला बाजारात नवनवीन स्मार्टफोन लाँच होताना दिसतात. त्यातच आता Poco ने आपला नवीन स्मार्टफोन Poco C71 भारतीय बाजारात लाँच केला आहे. बजेट फ्रेंडली असलेला हा फोन दमदार फीचर्ससह सुसज्ज असून यामध्ये मोठा डिस्प्ले, तगडी बॅटरी आणि लेटेस्ट सॉफ्टवेअरचा समावेश आहे. चला जाणून घेऊया या फोनचे खास फीचर्स आणि वैशिष्ट्ये.

डिस्प्ले आणि डिझाइन

Poco C71 मध्ये 6.88-इंचाचा HD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. याला 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट मिळतो, ज्यामुळे स्क्रोलिंग आणि गेमिंगचा अनुभव अतिशय स्मूथ होतो. 600 निट्स पीक ब्राइटनेस मुळे उन्हातही स्क्रीन स्पष्ट दिसते. Wet Touch टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे पाण्याचे थेंब पडले तरी टच चांगले काम करते. TÜV Rheinland सर्टिफिकेशनसह स्क्रीन डोळ्यांसाठी सुरक्षित मानली जाते.

प्रोसेसर आणि सॉफ्टवेअर

फोनमध्ये Unisoc T7250 हा प्रोसेसर दिला असून तो रोजच्या कामांसाठी; जसे की सोशल मीडिया, व्हिडिओ स्ट्रीमिंग, आणि हलकी गेमिंग तर अगदी सहजपणे हा मोबाईल काम करतो. तुम्हाला जर फार हाय-एंड परफॉर्मन्स नको असेल, पण उत्तम चालणारा फोन हवा असेल, तर हा प्रोसेसर तुमच्यासाठी योग्य आहे. यासोबतच Android 15 चे लेटेस्ट व्हर्जन मिळत आहे, जे केवळ फीचर्सने भरलेले नाही, तर सुरक्षितताही पुरवतो.

रॅम आणि स्टोरेज

Poco C71 मध्ये 6GB RAM असून याला 12GB पर्यंत वर्चुअल RAM चा सपोर्ट आहे. म्हणजेच, एकूण 18GB पर्यंत RAM चा अनुभव मिळू शकतो. याशिवाय, 128GB इंटरनल स्टोरेज असून ती 2TB पर्यंत वाढवता येऊ शकते.

कॅमेरा

या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी 32MP ड्युअल रिअर कॅमेरा दिला आहे, जो रोजच्या वापरासाठी उपयोगी पडतो. 8MP फ्रंट कॅमेरामुळे सेल्फी काढणेही सोपे आणि स्पष्ट होते. हा कॅमेरा सेटअप बेसिक फोटोग्राफीसाठी योग्य आहे.

बॅटरी आणि चार्जिंग

या फोनमध्ये 5,200mAh ची मोठी बॅटरी आहे, जी सहज संपूर्ण दिवसासाठी पुरेशी आहे. त्यासोबतच 15W फास्ट चार्जिंगची सुविधा आहे, त्यामुळे फोन लवकर चार्ज होतो आणि वेळही वाचतो.

डिझाइन आणि टिकाऊपणा

फोनला IP52 रेटिंग आहे, म्हणजेच तो धूळ आणि पाण्याच्या थेंबांपासून सुरक्षित आहे. साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, 3.5mm हेडफोन जॅक, आणि मजबूत बिल्ड क्वालिटी यामुळे डिझाईनबाबत कोणतीही तक्रार राहणार नाही.

कनेक्टिव्हिटी

Poco C71 मध्ये 4G नेटवर्क सपोर्ट, ड्युअल-बँड Wi-Fi, Bluetooth 5.2, आणि USB Type-C पोर्ट अशा सर्व आवश्यक कनेक्टिव्हिटी फीचर्सचा समावेश आहे.

वेरिएंट्स आणि उपलब्धता

Poco C71 हा Power Black, Cool Blue आणि Desert Gold या रंगांत उपलब्ध असून 4GB + 64GB आणि 6GB + 128GB अशा दोन व्हेरिएंट्समध्ये येतो. मोठा डिस्प्ले, दमदार बॅटरी, भरपूर स्टोरेज आणि Android 15 सॉफ्टवेअरचा अनुभव देणारा Poco C71 हलक्या ते मध्यम वापरासाठी खास आहे, विशेषतः त्यांच्यासाठी जे अ‍ॅक्टिव्ह युजर्स असून दररोजचा वापर अधिक सहज आणि प्रभावी हवा असतो.

निष्कर्ष

POCO C71 ₹6,499 (4GB + 64GB) आणि ₹7,499 (6GB + 128GB) किंमतीत उपलब्ध आहे. याचा मुख्य प्रतिस्पर्धी itel A80 आहे, जो चांगले कॅमेरे आणि उच्च IP रेटिंग देतो. जर कॅमेरा आणि IP रेटिंग तुम्हाला महत्त्वाचे असतील, तर itel A80 अधिक योग्य ठरू शकतो.

POCO C71 च्या मुख्य फायद्यात त्याचा मोठा डिस्प्ले, आकर्षक डिझाईन, आणि स्मूथ परफॉर्मन्स आहे, जो बजेट फोनसाठी चांगला आहे. यामुळे फोन भविष्यकाळातील सॉफ्टवेअर अपडेट्सनंतरही चांगला काम करेल. मात्र, याचे कॅमेरा आणि चार्जिंग स्पीड थोडे कमी आहेत.

जर तुमचं बजेट कमी असेल आणि तुम्हाला एक विश्वसनीय आणि चांगला परफॉर्मन्स असलेला फोन हवा असेल, तर POCO C71 एक उत्तम पर्याय आहे.

- 91Mobiles.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुला बॅट फेकायला मजा येते...! दिनेश कार्तिकच्या गुगलीवर रिषभ पंतची 'फेका फेकी', पाहा मजेशीर Video

Weight Loss Injection: खरंच वजन कमी करणं एवढं सोपं आहे? भारतात वेट लॉस इंजेक्शनची 3 महिन्यांत 50 कोटींची विक्री! तज्ज्ञांचं मत काय?

Ambad News : एस.बी.आय. बँकेच्या शाखेतून अज्ञात चोरट्याने मारला दोन लाख तीस हजार रुपयांवर डल्ला: बँक शाखेतून केले चोरट्याने पलायन

Pune News: शासनाच्या निर्णयाला डॉक्टरांचा विरोध, २४ तासांसाठी वैद्यकीय सेवा बंद; कधी अन् केव्हा?

Stock Market Closing: सेन्सेक्स 381 अंकांच्या घसरणीसह बंद; आज शेअर बाजारात विक्री का झाली?

SCROLL FOR NEXT