POCO F7 Mobile Price Features : मोबाईल गेमिंग प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रसिद्ध स्मार्टफोन ब्रँड POCO ने आपला नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन Poco F7 5G भारतात अधिकृतपणे लाँच केला आहे. हा फोन केवळ भारतीयच नव्हे, तर जागतिक बाजारातही एकाच वेळी लॉंच करण्यात आला असून यामध्ये कंपनीने अनेक ‘पॉवर-पॅक्ड’ फीचर्स दिले आहेत.
या फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची 7550mAh क्षमतेची बॅटरी, जी पोकोच्या आजवरच्या कोणत्याही डिव्हाइसपेक्षा अधिक आहे. ही बॅटरी केवळ दीर्घकाळ चालणारीच नाही, तर 90W टाइप C फास्ट चार्जिंग आणि 22.5W रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट करते.
फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. यात 12GB LPDDR5X RAM असून, ती व्हर्च्युअली 12GB पर्यंत वाढवता येते. यासोबत 512GB UFS 4.1 स्टोरेज पर्यायही उपलब्ध आहे.
फोनमध्ये 6.83-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो HDR10+ सपोर्ट, 120Hz रिफ्रेश रेट आणि 3200 निट्स पीक ब्राइटनेस सह येतो. Corning Gorilla Glass 7 प्रोटेक्शनमुळे स्क्रॅचपासून सुरक्षा मिळते.
फोनमध्ये 50MP + 8MP ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे, तर 20MP फ्रंट कॅमेरा सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी दिला आहे. फोटो आणि व्हिडिओंच्या बाबतीतही हा फोन प्रीमियम अनुभव देतो.
Poco F7 5G मध्ये दोन स्टोरेज व्हेरिएंट्स आहेत
12GB + 256GB – 31,999 रुपये
12GB + 512GB – 33,999 रुपये
फोन 1 जुलैपासून Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध असेल. प्री बुकिंग 25 जूनपासून सुरू झाली आहे. खरेदीदरम्यान 2,000 पर्यंत बँक डिस्काउंट मिळू शकतो.
हा फोन Frost White, Cyber Silver Edition आणि Phantom Black या आकर्षक रंगांत उपलब्ध आहे.
Poco F7 5G हा एक गेमिंग-फोकस्ड फोन असून त्याची बॅटरी, डिस्प्ले, RAM, कूलिंग सिस्टम आणि प्रोसेसर हे सगळे घटक मोबाईल गेमिंगला सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत.
एकंदरीत, POCO F7 5G हा 30-35 हजारांच्या किंमतमध्ये सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे. मोठ्या बॅटरीसह पॉवरफुल परफॉर्मन्स आणि दीर्घकालीन अपडेट्सची हमी देणारा हा फोन खरेच 'गॅमिंग बीस्ट' म्हणता येईल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.