Popular Celebrities Electric Cars
Popular Celebrities Electric Cars esakal
विज्ञान-तंत्र

Popular Celebrities Electric Cars : या 10 सेलिब्रिटींकडे आहेत कोट्यवधींच्या इलेक्ट्रिक कार

सकाळ डिजिटल टीम

Popular Celebrities Electric Cars : भारतात गाड्यांची मोठी क्रेझ आहे. आणि त्यात इलेक्ट्रिक कार म्हटलं की सोने पे सुहागा. भारतातील अनेक सेलिब्रेटीजकडे आता इलेक्ट्रिक गाड्या पाहायला मिळत आहेत. यात भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी सोबत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या सह अनेक जणांचा समावेश आहे.

आज तुम्हाला देशातील 10 प्रमुख व्यक्तींच्या फेवरेट इलेक्ट्रिक कार संबंधी माहिती देत आहोत.

मुकेश अंबानी यांच्याकडे टेस्ला कार

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या गॅरेज मध्ये सध्या टेस्लाच्या दोन इलेक्ट्रिक कार आहेत. याची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे. मुकेश अंबानीकडे टेस्लाच्या दोन इलेक्ट्रिक कार Tesla Model S 100D आणि Tesla Model X 100D आहेत.

चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार एमएस धोनीने किआची प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही किआ ईव्ही 6 खरेदी केली आहे. महेंद्र सिंह धोनीने जवळपास 5 महिन्याआधी किआची प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही किआ ईव्ही 6 खरेदी केली आहे. याची किंमत 60 लाख रुपयेहून जास्त आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नुकतेच बीएमडब्ल्यूची पॉवर इलेक्ट्रिक एसयूव्ही BMW iX सोबत पाहिले गेले आहे. याची किंमत 1 कोटी रुपयेहून जास्त आहे. टाटा मोटर्स आणि टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन टाटा नेक्सॉन ईव्ही चालवतात.तर अभिनेता रितेश देशमुखकडे दोन पॉवरफुल इलेक्ट्रिक कार BMW iX आणि Tesla Model X आहे. याची किंमत एक कोटीहून जास्त आहे.

अभिनेत्री माधुरी दीक्षितने नुकतीच Tata Nexon EV Dark Edition खरेदी केली आहे. याची किंमत 20 लाख रुपयेहून जास्त आहे.पॉप्यूलर तेलुगु स्टार महेश बाबू यांच्याकडे Audi e-tron इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. याची किंमत 1 कोटीहून जास्त आहे. मलाळ्यम अभिनेत्री मंजू वॉरियरकडे MINI Cooper SE आहे. याची किंमत 50 लाखाहून जास्त आहे. अभिनेत्री आणि अँकर मंदिरा बेदीकडे Tata Nexon EV आणि मराठी अभिनेता स्वप्निल जोशीकडे जॅग्वार आय पेस कार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! 50 हजार शासकीय पदांची मेगाभरती अन्‌ मुलींच्या मोफत शिक्षणाचा निर्णय लवकरच; 20 लाख मुलींना मिळणार 642 कोर्सेसचे मोफत उच्चशिक्षण

Lok Sabha Result Maharashtra: काँग्रेसचा सिक्सर अन् भाजप हिट विकेट; वाचा, लोकसभा निवडणुकीत कशी होती महाराष्ट्रातील पक्षांची कामगिरी

T20 World Cup : ऑस्ट्रेलियाच्या ऐतिहासिक पावलाची सुरुवात जागतिक कसोटी;एकदिवसीय विश्‍वकरंडकानंतर आता टी-२० वर्ल्डकपच्या जेतेपदाचे ध्येय

Yoga For headache : सततच्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? मग, दररोज करा ‘ही’ योगासने, लवकर मिळेल आराम

West Bengal Violence: निवडणुका संपताच बंगालमध्ये उसळला हिंसाचार; TMC नेत्याच्या घरावर फेकला बॉम्ब, भाजप कार्यालयाची तोडफोड

SCROLL FOR NEXT