Dryer Hanger eSakal
विज्ञान-तंत्र

Dryer Hanger : ओले कपडे आणि बूट काही मिनिटातच सुकवेल हे डिव्हाईस; अवघी ५५० रुपये किंमत

पावसाळ्यात कपडे लवकर वाळत नाहीत ही समस्या सगळ्यांनाच जाणवते.

Sudesh

मान्सूनने राज्यात सगळीकडे हजेरी लावली आहे. यामुळे पावसाळ्यात दरवर्षी उद्भवणाऱ्या एका मोठ्या समस्येने पुन्हा डोकं वर काढलं आहे. ही समस्या म्हणजे, ओले कपडे आणि बूट. पावसाळ्यात कपडे लवकर वाळत नाहीत ही तक्रार सगळ्यांचीच असते. तुम्हीदेखील यामुळे वैतागले असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

बाजारात सध्या एक असं डिव्हाईस आलं आहे, जे तुमचे ओले कपडे आणि बूट काही मिनिटांमध्येच वाळवेल. विशेष म्हणजे, या उपकरणाची किंमतही अगदी परवडणारी आहे. या उपकरणाबाबत आम्ही तुम्हाला आज माहिती देणार आहोत.

ड्रायर हँगर

पोर्टेबल इलेक्ट्रिक क्लोथ्स ड्रायर हँगर असं या डिव्हाईसचं नाव आहे. हे विजेवर चालणारे हे उपकरण एका हँगरप्रमाणेच दिसते. एखाद्या हेअर ड्रायरप्रमाणे यातून गरम हवा बाहेर पडते, आणि कपडे किंवा बूट वाळवण्यासाठी याचा वापर होतो. (portable electric clothes dryer hanger)

कसं करतं काम?

तुम्हाला यासाठी एखाद्या हँगरवर ज्याप्रमाणे कपडे अडकवता, तसे यावर अडकवावे लागतील. यानंतर बटण दाबल्यानंतर याच्या दोन्ही बाजूला असलेल्या पाईप्समधून गरम हवा बाहेर पडेल. यामुळे तुमचे कपडे आरामात वाळतील.

हे डिव्हाईस पाच किलोपर्यंतचे वजन पेलू शकते. त्यामुळे तुमच्या जड जीन्सदेखील याच्या मदतीने वाळलू शकता. दोन्ही बाजूला असलेले दोन पाईप्स तुम्ही दोन बुटांमध्ये सोडून बूटही वाळवू शकता.

किंमतही कमी

या डिव्हाईसची किंमत देखील अगदी कमी आहे. ५०० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत याची किंमत आहे. तुम्ही कोणत्या ई-कॉमर्स वेबसाईटवरून याची खरेदी करताय त्यानुसार किंमतीत बदल होईल. तुम्हाला हे डिव्हाईस ऑफलाईन देखील मिळू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT