Bikes Marathi News
Bikes Marathi News Bikes Marathi News
विज्ञान-तंत्र

भारतीय बाजारपेठेत या महिन्यात लाँच होणार तीन पॉवरफुल बाइक्स

सकाळ डिजिटल टीम

भारतीय बाजारपेठेत (Indian market) जुलै महिन्यात अनेक कंपन्या आकर्षक बाइक्स (Bikes) लाँच करणार आहेत. या कंपन्यांमध्ये बीएमडब्ल्यू (BMW) बाइक्स आपली सर्वांत स्वस्त फुल-फेअर स्पोर्ट्स बाइक सादर करणार आहे. तसेच अथर (Ather) देखील अपडेटेड ४५०X बाइक सादर करणार आहे. चला तर जाणून घेऊ या महिन्यात लॉंच होणाऱ्या काही बाइक्स विषयी... (Bikes Marathi News)

एथर 450X फेसलिफ्ट

११ जुलै २०२२ रोजी एथर एनर्जी अपडेटेड ४५०X इलेक्ट्रिक स्कूटर (Bikes) बाजारात आणणार आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये पूर्वीपेक्षा अधिक रेंज आणि अपडेटेड फिचर्स असतील. सध्या बाजारात असलेल्या या कंपनीच्या स्कूटरमध्ये २.९ kWh क्षमतेचा बॅटरी पॅक बसवला आहे. ही स्कूटर एका चार्जमध्ये ११६ किमीपर्यंत चालेल. यामध्ये कंपनी कॉस्मेटिक अपडेट्स देखील करू शकते.

बीएमडब्ल्यू जी ३१० आरआर बाइक

बीएमडब्ल्यू बाइक भारतीय बाजारात (Indian market) १५ जुलै २०२२ रोजी बीएमडब्ल्यू जी ३१० आरआर (BMW G ३१० RR) लाँच करणार आहे. ही बाइक Apache RR३१० वर आधारित आहे. नवीन बीएमडब्ल्यू जी ३१० आरआर सिंगल-सिलिंडर इंजिनद्वारे समर्थीत आहे. लिक्विड-कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित एफआय इंजीन मिळणे अपेक्षित आहे. इंजीन क्षमता ३३.५ bhp पॉवर आणि २८ Nm पीक टॉर्क जनरेट करण्याची आहे. या बाइकमध्ये कंपनी ६-स्पीड गिअर बॉक्ससह इतर अनेक आधुनिक फीचर्स देऊ शकते.

हार्ले-डेव्हिडसन नाइटस्टर

कंपनी या महिन्याच्या अखेरीस भारतीय बाजारात (Indian market) हार्ले-डेव्हिडसन नाइटस्टर (Harley-Davidson Nightster) सादर करू शकते. कंपनीच्या नवीन बाइक हार्ले-डेव्हिडसन नाईटस्टर स्पोर्टस्टर एसचा हा एक हलका पर्याय आहे. यात वी-ट्विन रेवोल्यूशन मॅक्स इंजीन मिळू शकते. जे ८८ bhp कमाल पॉवर आणि ९५ Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. या इंजीनसोबत ६-स्पीड गिअर बॉक्स उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

या बाइक झाल्या लाँच

महिन्याच्या सुरुवातीलाच सुझुकी कताना लाँच झाली आहे. ही बाइक १३.६१ लाखांपासून सुरुवात होते. या बाइकमध्ये कंपनीने इनलाइन-फोर सिलिंडरसह ९९९ सीसी इंजीन बसवले आहे. या इंजीनची शक्ती १५० bhp आणि १०६ Nm पीक टॉर्क बनवते. तसेच दुसरी बाइक ही टीवीएस रोनिन २२५ (TVS Ronin २२५) आहे. या बाइकमध्ये सिंगल-सिलिंडर ऑईल-कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित २२५ cc FI इंजीन आहे. कंपनीने ही बाइक १.४९ लाखांच्या सुरुवातीच्या किमतीत बाजारात आणली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

LSG vs MI IPL 2024 Live : मुंबईच्या गोलंदाजांनी केला टिच्चून मारा; लखनौचा निम्मा संघ गारद, सामन्यात रंगत

SCROLL FOR NEXT