AIIMS  Sakal
विज्ञान-तंत्र

Cyber Attack: AIIMS वरील सायबर हल्ल्यामागे चीनचा हात? धक्कादायक माहिती आली समोर

देशातील प्रमुख हॉस्पिटलपैकी एक असलेल्या दिल्ली येथील AIIMS वर काही दिवसांपूर्वी सायबर हल्ला झाला होता. या सायबर हल्ल्याबाबत आता मोठा खुलासा झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

AIIMS Ransomware Attack: देशातील प्रमुख हॉस्पिटलपैकी एक असलेल्या दिल्ली येथील AIIMS वर काही दिवसांपूर्वी सायबर हल्ला झाला होता. या सायबर हल्ल्याबाबत आता मोठा खुलासा झाला आहे. केंद्रीय कुटुंब कल्याण आणि आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, AIIMS च्या सर्व्हरवर झालेल्या सायबर हल्ल्यामागे चीनचा हात आहे.

रिपोर्टनुसार, AIIMS वर सायबर अटॅक चीनकडून करण्यात आला आहे. सायबर हल्ल्यामागील हॅकर्सचा शोध घेताना IP अ‍ॅड्रेस चीनचा असल्याचे आढळले. हॅकर्सने AIIMS च्या १०० सर्व्हरपैकी ५ ला हॅक केले होते. या पाचही सर्व्हरचा डेटा परत मिळवण्यास यश आले आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर- कशाने मिळेल सूट, कशावर भरावा लागेल कर....

AIIMS च्या सर्व्हरवर २३ नोव्हेंबरवर सायबर अ‍टॅक झाला होता. हा सायबर हल्ला हाँगकाँगच्या दोन मेल आयडीद्वारे करण्यात आला होता. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे इंटेलिजेंस फ्यूजन स्टॅटिक ऑपरेशन्स याचा तपास करत आहे. ईमेलचा IP अ‍ॅड्रेस हाँगकाँगचा असल्याने यामागे चीन असल्याचे सांगितले जात आहे.

सायबर हल्ल्यामागील मुख्य मेल आयपी अ‍ॅड्रेस 146.196.54.222 आहे. दिल्ली पोलिसांद्वारे परराष्ट्र मंत्रालयाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, AIIMS च्या सर्व्हरवर मागील महिन्यात मोठे सायबर हल्ले झाले होते. यामुळे सर्व्हर डाउन झाले होते. याचा फटका अनेक सेवांना बसला होता. हॅकर्सने क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून २०० कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र, हॅकर्सने अशी कोणतीच मागणी केली नसल्याचे पोलिसांनी म्हटले होते.

हेही वाचा: Jio 5G: जिओ यूजर्सला मिळणार सुपरफास्ट इंटरनेटचा फायदा, ५जी साठी करा फक्त 'एवढ्या' किंमतीचा रिचार्ज

AIIMS च्या सर्व्हरवर अनेक VVIP लोकांचा डेटा उपलब्ध आहे. यामध्ये माजी पंतप्रधान, मंत्री, अधिकारी आणि व्हीआयपी व्यक्तींचा समावेश आहे. या लोकांची माहिती चोरी करण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये परप्रांतीय नागरिकाला मारहाण; मनसे पदाधिकाऱ्यांसह स्थानिकांवर गुन्हा

Crime News: लग्न जमत नव्हत... शेवटी ठरलं पण पत्नी निघाली 'दरोडेखोर वधू', नवरा लावायचा नवीन तरुणांशी लग्न! अशा प्रकारे झाला पर्दाफाश

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

SCROLL FOR NEXT