भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी एक क्रांतिकारी डिजिटल पाऊल टाकलं असून, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते RailOne नावाच्या नव्या मोबाइल अॅपचा शुभारंभ करण्यात आला. या अॅपच्या माध्यमातून तिकीट बुकिंगपासून जेवण ऑर्डर करण्यापर्यंत, प्रवासाशी संबंधित सर्व सेवा आता एकाच ठिकाणी मिळणार आहेत.
ही घोषणा रेल्वे माहिती प्रणाली केंद्राच्या (CRIS) 40व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात करण्यात आली. RailOne अॅप Android आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून, हे अॅप प्रवाशांसाठी एकात्मिक डिजिटल सेवा मंच ठरणार आहे, असं रेल्वे मंत्रालयाने सांगितलं.
आरक्षित व अनारक्षित तिकीट बुकिंग
प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग
ट्रेन आणि PNR स्थितीची माहिती
प्रवास नियोजन सेवा
ऑनबोर्ड जेवण बुकिंग
मालवाहतूक चौकशीची सोय
यामुळे प्रवाशांना वेगवेगळ्या अॅप्सचा वापर करण्याची गरजच उरणार नाही.
RailOne अॅपमध्ये Single Sign-On (SSO) सुविधा देण्यात आली आहे, ज्यामुळे वेगवेगळ्या सेवा वापरण्यासाठी वेगवेगळ्या लॉगिन्सची गरज नाही. वापरकर्ते RailConnect किंवा UTSonMobile अॅपचा आयडी वापरून सहज लॉगिन करू शकतात.
अॅपमध्ये R-Wallet (रेल्वे ई-वॉलेट) ची सुविधा देखील देण्यात आली आहे. वापरकर्ते mPIN किंवा बायोमेट्रिक लॉगिनसह अॅपमध्ये सहज प्रवेश करू शकतात. नव्या युजर्ससाठी फक्त आवश्यक माहिती पुरवून झपाट्याने नोंदणी होऊ शकते. चौकशीसाठी पाहुणा लॉगिनची (Guest Login) सुविधा देखील उपलब्ध आहे केवळ मोबाईल क्रमांक व OTP पुरेसं!
RailOne अॅपची रचना सरळ, वापरण्यास सोपी आणि युजर-फ्रेंडली असून, सर्व सेवा एका ठिकाणी मिळण्यामुळे प्रवाशांचा वेळ, डेटा आणि मोबाईल स्पेस वाचणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की RailOne अॅपमुळे डिजिटल इंडिया मोहिमेला बळ मिळेल आणि भारतीय रेल्वेची सेवा अधिक पारदर्शक व प्रवासी केंद्रित होईल.
RailOne अॅप म्हणजे एकाच अॅपमध्ये भारतीय रेल्वेच्या सर्व सुविधा तिकीट, माहिती, जेवण, मालवाहतूक आणि तेही सिंगल साइन-ऑनसह. आता प्रवासासाठी वेगवेगळ्या अॅप्सची गरज नाही, RailOne पुरेसं आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.