Rakshabandhan esakal
विज्ञान-तंत्र

Rakshabandhan 2023 : आता अवघ्या 2 तासांपेक्षाही कमी वेळेत पोहोचेल तुमची राखी, या अॅपमुळे काम होणार सोपं

बरेच लोक रक्षाबंधनाची तयारी खूप आधीपासून करतात

सकाळ डिजिटल टीम

Rakshabandhan : तुम्हीही तुमच्या भावाला किंवा बहिणीला राखी/भेटवस्तू पाठवायला विसरला असाल तर अजून उशीर झालेला नाही. हे अॅप्स तुमची राखी किंवा भेटवस्तू 2 तासांपेक्षा कमी वेळेत पोहोचवतील.

बरेच लोक रक्षाबंधनाची तयारी खूप आधीपासून करतात, तर काहींना एक-दोन दिवस आधी लक्षात येते की त्यांना राखी किंवा भेटवस्तू पाठवायची आहे. अशा लोकांसाठी, ऑनलाइन अॅप्स खूप फायदेशीर ठरतात. रक्षाबंधनाला आता फक्त दोनच दिवस उरले आहेत, आम्ही तुम्हाला अशाच काही अॅप्सबद्दल सांगणार आहोत जे एका दिवसात तुमच्यापर्यंत वस्तू पोहोचवण्याचा दावा करतात. हे अॅप्स त्याच दिवशी डिलिव्हरी पर्याय देतात किंवा तुम्ही निवडलेल्या त्याच दिवशी डिलिव्हरी करतात.

Fnp

या प्लॅटफॉर्मचा दावा आहे की ते तुमची भेटवस्तू किंवा राखी 2 तासांत तुम्हाला हव्या त्या ठिकाणी पोहोचवेल. यासाठी तुम्हाला बाजारात जाण्याचीही गरज भासणार नाही. या अॅपवरच तुम्हाला गिफ्ट हॅम्पर, कॉम्बो, मिठाई आणि चॉकलेट्स इत्यादी मिळतील.

igp

तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर अनेक पर्याय मिळत आहेत, ज्यामधून तुम्ही स्वतःसाठी सर्वोत्तम भेटवस्तू किंवा राखी निवडू शकता आणि ती तुमच्या भावाला किंवा बहिणीला सहजपणे पोहोचवू शकता.

WINNI

विन्नी या अॅपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या भावा आणि बहिणीला फोटो फ्रेमपासून चॉकलेट्स भेट देऊ शकता. तुम्हाला यावर जास्त महागड्या वस्तू मिळत नाहीत. तुम्हाला इथे बजेटमध्ये अनेक पर्याय मिळतात.

Amazon

Amazon हे ऑनलाइन शॉपिंगसाठी लोकप्रिय अॅप आहे. पण याचबरोबर ते तुम्हाला त्याच दिवशी डिलिव्हरीसाठी पर्याय देखील देत आहे. यावर तुम्हाला पुष्पगुच्छ (फुलांचा गुच्छ), भेटवस्तू इ. पाठवता येतात. जर तुम्ही प्राइम मेंबर असाल तर तुम्हाला डिलिव्हरी चार्जेस देखील लागू होणार नाहीत.

Archies

तसं तर हे अॅप तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि त्यावर तुम्हाला भेटवस्तू खरेदी करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अॅप्सबद्दल नमूद केलेली सर्व माहिती त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून घेण्यात आली आहे. कोणतीही भेटवस्तू विकत घेण्यापूर्वी स्वतः त्या काळजीपूर्वक तपासा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT