Sim card Sakal
विज्ञान-तंत्र

Sim Card: ड्यूल सिम वापरणाऱ्यांची होणार अडचण? 'हे' आहे कारण

अनेक स्मार्टफोन यूजर्स दोन सिम कार्ड वापरतात. परंतु, रिचार्ज प्लान्सच्या किंमती वाढल्याने दोन सिम कार्ड सुरू ठेवणे परवडणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

Recharge Plan Price Hike: कमी किंमतीतील रिचार्ज व ड्यूल सिम स्लॉटसह येणारे स्मार्टफोन यामुळे अनेकजण दोन सिम कार्ड वापरतात. काही महिन्यांपूर्वी सिम कार्ड सुरू ठेवण्यासाठी रिचार्ज करण्याची गरज नव्हती. मात्र, आता परिस्थिती बदलली असून, सिम कार्ड अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी दरमहिन्याला रिचार्ज करावे लागते.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत वाढ केली आहे. हीच वाढ पुढेही पाहायला मिळू शकते. त्यामुळे सेकेंडरी सिम सुरू ठेवण्यासाठी खिश्यावर भार पडणार आहे. असे झाल्यास दोन सिम कार्ड वापरणे महागात पडू शकते.

टेलिकॉम कंपन्यांनी गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात रिचार्ज प्लॅन्सची किंमत वाढवली होती. एअरटेलने काही दिवसांपूर्वीच मिनिमम रिचार्ज प्लॅन्सची किंमत देखील वाढवली आहे. आधी ग्राहकांना कमीत कमी ९९ रुपयांचे रिचार्ज करावे लागत असे. परंतु, आता यासाठी १५५ रुपये खर्च करावे लागतात. म्हणजेच कंपन्यांनी ५७ टक्के वाढ केली आहे. गेल्यावर्षी कंपन्यांनी ७९ रुपयांवरून कमीत कमी रिचार्जची किंमत ९९ रुपये केली होती.

उत्पन्न वाढवण्यासाठी रिचार्जच्या किंमतीत वाढ

गेल्यावर्षीप्रमाणेच या वर्षी देखील रिचार्ज प्लॅन्सच्या किंमतीत २० ते २५ टक्के वाढ पाहायला मिळू शकते. प्रीपेड रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत वाढ झाल्यास कंपनीचे ARPU आणि ओव्हर ऑल रेव्हेन्यू वाढेल. एअरटेल आणि वीआय या कंपन्या उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. ५जी लाँचनंतर कंपन्या रिचार्जच्या किंमतीत आणखी वाढ करण्याची शक्यता आहे.

दोन सिम कार्ड वापरणे पडणार महागात

टेलिकॉम सेवा स्वस्त असल्याने दोन सिम कार्ड वापरण्यास सुरुवात झाली होती. परंतु, आता सर्वच टेलिकॉम ऑपरेटर्सच्या रिचार्ज प्लान्सची किंमत जवळपास समान आहे. वारंवार वाढणाऱ्या रिचार्जच्या किंमतीमुळे स्मार्टफोन यूजर्सच्या खिश्यावर भार पडू शकतो. अशात, दोन सिम कार्ड वापरणे सर्वसामान्य यूजर्सला परवडण्यासारखे नाही. प्रीपेड रिचार्ज प्लॅन्सच्या किंमतीत आणखी वाढ झाल्यास अनेकजण सेकंडरी सिम बंद करू शकतात. कारण, दोन्ही सिमवर एकाच किंमतीत जवळपास समान सेवा मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Trains: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १७ जुलैपर्यंत पुणे-मुंबई २५ गाड्यांचे मार्ग बदलले, दौंड-मनमाड मार्गे गाड्या वळवल्या..

Maharashtra land Acquisition: भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्याचा मोठा निर्णय; १०३ विशेष भूसंपादन अधिकारी पदांची पुनर्रचना, प्रकल्पांना मिळणार वेग

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Kolhapur Monsoon Rainfall : धरण क्षेत्रांत 41 दिवसांत 36 वेळा अतिवृष्टी; सर्वाधिक पाटगाव क्षेत्रात, सर्फनालामध्ये 24 तासांत 347 मिमी.ची नोंद

उत्तम गुंतवणूक : एलेनबारी इंडस्ट्रियल गॅसेस (शुक्रवारचा बंद भाव : रु. २९४.२५)

SCROLL FOR NEXT