ChatGPT  Sakal
विज्ञान-तंत्र

ChatGPT च्या मदतीने बनवला CV, आता जॉबसाठी येत आहेत हजारो कॉल्स

चॅटजीपीटीवर लोक वेगवेगळे प्रयोग करत आहेत आणि त्याचे अनपेक्षित परिणामही समोर येत आहेत.

राहुल शेळके

ChatGPT: आर्टिफिशियल इंटेलिजेंस चॅटबॉट चॅटजीपीटीबद्दल दररोज अशा काही बातम्या येतात ज्या आपल्याला आश्चर्यचकित करतात. चॅटजीपीटीवर लोक वेगवेगळे प्रयोग करत आहेत आणि त्याचे अनपेक्षित परिणामही समोर येत आहेत.

स्पर्धेच्या या युगात अनेक लोक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत एक चांगला रेझ्युम मुलाखतीसाठी खूप महत्त्वाचा आहे. एका Reddit वापरकर्त्याने चांगला रेझ्युम बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याची पद्धत इतरांपेक्षा खूप वेगळी होती. चांगला रेझ्युम तयार करण्यासाठी, या वापरकर्त्याने GPT-3.5 ChatGPT ची मदत घेतली.

ChatGPT च्या मदतीने रेझ्युम केला तयार:

वापरकर्त्याने Reddit वर आपली परिस्थिती सांगितली की अनेक नोकऱ्यांसाठी अर्ज करूनही त्याला कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्याने रेझ्युम तयार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी ChatGPT ची मदत घेतली. असे केल्याने त्याचा सीव्हीकडे कंपन्यांचे लक्ष जाईल असे त्याला वाटले.

ChatGPT ने वापरकर्त्याची कौशल्ये, पात्रता आणि अनुभव या आधारावर रेझ्युम तयार केला. रेझ्युममध्ये आकर्षक डिझाईन आणि फॉरमॅटिंग देखील समाविष्ट आहे जेणेकरून ते चांगले दिसेल आणि वाचण्यास सोपे होईल.

एका Reddit वापरकर्त्याचा दावा आहे की त्याने नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी आणि रेझ्युम तयार करण्यासाठी ChatGPT चा वापर केला. हे केल्यानंतर अनेक कंपन्यांकडून मुलाखतीसाठी बोलावले जात असल्याचे तो सांगतो. त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे की त्याने चॅटजीपीटीला रेझ्युम तयार करण्यास सांगितला.

कंपन्यांनी रेझ्युमचे कौतुक केले:

वापरकर्त्याने लिहिले, ज्या कंपन्यांचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता, त्याला आता तिथूनही मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे. मी रेझ्युम पाठवताना विचार करत होतो की पाठवला तर मला फोन येणार नाही.

पण मला हे पाहून आश्चर्य वाटते की मला बर्‍याच चांगल्या कंपन्यांचे फोन आले, काही ठिकाणी त्याने मुलाखती दिल्या आणि त्याची निवडही झाली. आणि मुलाखत घेणाऱ्या टीमने सुद्धा सांगितले की, तुम्ही बनवलेला रेझ्युम प्रभावी होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT