Redmi A4 5G mobile launched price features esakal
विज्ञान-तंत्र

स्वस्तात मस्त! लॉन्च झाला Redmi A4 5G मोबाईल; किंमत फक्त 9,999, दमदार फीचर्स अन् ऑफर्स एकदा बघाच..

Redmi A4 5G mobile launched price features : रेडमी ने १०,००० रुपयांच्या आत दमदार 5G स्मार्टफोन Redmi A4 सादर केला आहे.

Saisimran Ghashi

Redmi New Smartphone : भारतीय बाजारपेठेत बजेट श्रेणीतील ग्राहकांसाठी एक आकर्षक पर्याय म्हणून रेडमीने आपला नवा स्मार्टफोन Redmi A4 5G लॉन्च केला आहे. केवळ ९,९९९ रुपायांमध्ये उपलब्ध होणारा हा स्मार्टफोन 5G कनेक्टिव्हिटीसह प्रगत फिचर्स देतो, जे आजच्या युगात खूपच महत्त्वाचे बनले आहे.

जबरदस्त फिचर्स, बजेट किंमत

Redmi A4 5G मध्ये दिले आहेत आकर्षक फिचर्स –

  • प्रचंड 6.88 इंचाचा HD+ डिस्प्ले, ज्यात 120Hz रिफ्रेश रेट आणि 600 निट्स ब्राइटनेस आहे, त्यामुळे व्हिडीओ बघणे आणि गेमिंगचा अनुभव उत्तम मिळतो.

  • Snapdragon 4 Gen 2 चा पॉवरफुल प्रोसेसर जो रोजच्या वापरासाठी गतीशील परफॉर्मन्स देतो.

  • 50MP चा मुख्य रियर कॅमेरा आणि 5MP फ्रंट सेल्फी कॅमेरा, जे फोटोग्राफी प्रेमींसाठी चांगला पर्याय आहेत.

  • 5160mAh बॅटरी जी 18W फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते, म्हणजे संपूर्ण दिवस बॅटरीची काळजी नाही.

  • HyperOS आधारित Android 14 सिस्टीम, जी वापरासाठी सहज आणि गतीशील आहे.

  • आणि हो, यामध्ये आहे Jio True 5G साठी फुल सपोर्ट मिळतो

विविध व्हेरिएंट्स आणि किंमती

Redmi A4 5G चे तीन वेगवेगळे व्हेरिएंट्स बाजारात आणले गेले आहेत

6GB + 128GB 9,999 रुपये

4GB + 128GB 9,499 रुपये

4GB + 64GB 8,499 रुपये

कधी आणि कुठे खरेदी करायचा?

२२ जून २०२५ पासून हा स्मार्टफोन Amazon आणि इतर अधिकृत रिटेलर्समार्फत खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. जर तुम्ही 5G फोन घेण्याचा विचार करत असाल, तर हा फोन एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

डिझाइन आणि रंग पर्याय

Redmi A4 5G दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे:

  • Sparkle Purple

  • Starry Black

या स्मार्टफोनचा स्लिम आणि स्टायलिश लूक, त्याचे आधुनिक फिचर्स आणि बजेटमधील किंमत पाहता, हा फोन विशेषतः कॉलेज विद्यार्थ्यांपासून ते कामासाठी स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरतो.
जर तुम्हाला १०,००० रुपयांच्या आत 5G स्मार्टफोन हवा असेल, जो चांगला प्रोसेसर, मोठा डिस्प्ले, दमदार कॅमेरा आणि मजबूत बॅटरीसह येतो तर Redmi A4 5G तुमच्यासाठी एक ‘व्हॅल्यू फॉर मनी’ पर्याय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

P Chidambaram: २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध कारवाई का नाही केली? काँग्रेस नेते चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Stock Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी 80 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स चमकले?

Durgashtami 2025 Rashibhavishya: दुर्गाष्टमीला बनतोय उभयचरी योग; मेषसह या दोन राशींवर होणार लाभाचा वर्षाव

Mumbai Local: लोकलला मिळाले स्वयंचलित दरवाजे, महाव्यवस्थापकांची पाहणी; Video Viral

लंडनमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड, गांधी जयंतीच्या २ दिवस आधी घटनेमुळे खळबळ; भारतीय दुतावासाने केला निषेध

SCROLL FOR NEXT