Redmi Note 14 Mobile 5G series Price Features camera all details esakal
विज्ञान-तंत्र

Redmi Note 14 : ‘रेडमी नोट 14, 5G सिरीज’ने केली 1 हजार कोटींची कमाई, iPhone सारख्या दिसणाऱ्या मोबाईलमध्ये नेमकं काय खास? पाहा

Redmi Note 14 Mobile 5G series Price Features camera all details :

Saisimran Ghashi

Redmi Note 14 Mobile Price Features : ‘शाओमी इंडिया’च्या ‘रेडमी नोट 14, 5G सिरीज’ या मोबाईल फोन श्रेणीने बाजारात आणल्यापासून दोनच आठवड्यांत कंपनीला एक हजार कोटींचा महसूल प्राप्त करून दिला आहे. या कामगिरीसह कंपनीने स्मार्टफोन बाजारात पाय रोवले असून, ‘रेडमी नोट १४’ ही श्रेणी या प्रकारच्या मोबाईल फोन्समध्ये आघाडीवर असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले.

‘कंटेंट क्रिएटर्स’मध्ये या फोनचा विशेष प्रचार केला जात आहे. राजकुमार हे कंटेंट क्रिएटर म्हणाले, ‘‘मला या कामासाठी सतत फिरावे लागते आणि अनेक तास मोबाईल फोनवर काम चालते. मी ‘रेडमी नोट १४ प्रो प्लस ५-जी’ हा फोन वापरून पाहिला. ६२०० मिली ॲम्पिअर प्रति तास बॅटरी आणि ९० वॉट हायपरचार्ज यांच्या साह्याने अनेक तास चित्रीकरण करता येते.

५० मेगापिक्सेलच्या नाइट मोड कॅमेऱ्यामुळे कमी प्रकाशातही उत्तम चित्रीकरण करता येते. ’’ या वेळी ‘शाओमी’ने ‘रेडमी १४ सी ५-जी’ हा स्मार्टफोन बाजारात आणला असून, ६.८८ इंच लांबीचा डिस्प्ले, ५० मेगापिक्सेलचा ड्युएल कॅमेरा यात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रॉपर्टीची दस्त नोंदणी १५ दिवसांत! तक्रार आल्यास मंडलाधिकाऱ्यांना निकालासाठी तीन महिन्याची मुदत; तक्रारदारास प्रांताधिकाऱ्यांकडे अपिलाचाही अधिकार

आजचे राशिभविष्य - 02 एप्रिल 2026

Ragi Masala Chilla Wrap : झटपट तयार होणारा, पौष्टिक अन् चविष्ट 'रागी मसाला चिला रॅप'; दिवसाची सुरुवात करा एनर्जेटिक नाश्त्याने! लगेच लिहून घ्या सोपी रेसिपी

Panchang : 2 एप्रिल पंचांग विशेष! हनुमान जयंती, पौर्णिमा आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

खासगी इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश! एप्रिलमध्येच ‘आरटीई’ची लॉटरी; सोलापूर जिल्ह्यात २७८२ जागांसाठी ६ हजार ७०९ विद्यार्थ्यांचे अर्ज, वाचा...

SCROLL FOR NEXT